भारतासह निम्म्या युरोपला मोस्ट वॉंटेड असलेला कुख्यात दहशतवादी दाऊद पाकिस्तानात राहत असल्याच अखेर पाकिस्तान कबूल केल असून, इतके दिवस सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दबावापुढे मान झुकवली.साधारण 2005 पासून पाकिस्तानात आसरा घेणाऱ्या दाऊदला पाकिस्तानी हेर संघटना आय. एस. आय ने आंजारल, गोंजारल असून त्याला लपवून ठेवल होत. भारतविरोधी कारवाया करण तसच आशियातील हत्यारांचा बिझनेस, क्रिकेट सट्टेबाजी, ड्रग्ज सप्लाय आणि तस्करी इ तो पाकिस्तानातून हाताळत होता.

पाकिस्तानने दाऊद वास्तव्याची रितसर कबुली दिल्यानंतर परत एकदा पाकिस्तानच नाक आंतरराष्ट्रीय समुदायासमोर कापल गेल असून भारताचा दबदबा मान्य झाला आहे. पाकिस्तानने दाऊदचे कराची स्थित पाच पत्ते दिले असून डि 13, ब्लॉक, सेक्टर एस, कराची डेव्हलपमेंट अॅथॉरिटी क्लिफटन कराची. हा त्याचा लेटेस्ट पत्ता आहे. हा एरिया हाय सिक्युर असून अनेक दूतावास या भागात स्थित आहेत. या पत्तयाबरोबरच भारतातील महाराष्ट्र, रत्नागिरी हा पत्ताही या यादीत समाविष्ट आहे.
दाऊद आणि रत्नागिरी!
दाऊदचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरीचा असून त्याच खर नाव शेख दाऊद इब्राहिम कासकर आहे.त्याचे वडील शेख इब्राहिम कासकर मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते. काही काळ रत्नागिरीत घालवल्यावर दाऊदच कळत बालपण मुंबईतील डोंगरी भागात गेल. शाळेतील वाईट संगत, किंमती वस्तूंची आस, व्यसन यान दाऊद शाळा निम्म्यातच सोडून चोरी, डकैती करू लागला. दरम्यान करीम लाला गॅंगमध्ये समाविष्ट होत त्यान तस्करी, ड्रग्ज सप्लाय सुरू केला. दाऊद या दलदलीत फसत गेला.

नंतर तो हाजी मस्तानच्या संपर्कात आला आणि त्यान तस्करी, सट्टेबाजी, फिल्म फायनान्स या क्षेत्रात आगेकूच केली. 1977साली त्यान पहिली स्मगल बोट लुटली आणि गुन्हेगारी विश्वात त्याचा दबदबा निर्माण झाला. 1980 च्या दशकात तो डॉन झाला होता. हप्ता वसुली, हत्यार, ड्रग्ज, स्मगलींग, क्रिकेट सट्टेबाजी, फिल्म फायनान्स करणारा दाऊद 1993 च्या मुंबई सिरीयल बॉम्बस्फोट प्रकरणानंतर दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉंटेड झाला.

12 मार्च 1993 साली मुंबईतील 13 जागी बॉम्बस्फोट झाले ज्यात 257 निरपराध लोकांचा मृत्यू झाला तर कित्येकजण जखमी, अपंग झाले. या पाकिस्तानच्या निघृण कारवाईत दाऊदन मास्टर माईंड म्हणून काम केल. यानंतर तो भारतातून पळाला व युएई नंतर पाकिस्तान असा स्थिरस्थावर झाला. सद्यस्थितीत त्याच्याकडे 14 पासपोर्ट असून सगळीकडून उघड्या पडलेल्या या डॉनला पकडण आता मुश्कीलही नाही आणि नामुमकीन तर मुळीच नाही
Add Comment