Home » जरा भान ठेवा, आपण कुत्री, मांजर, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी आमदारांना खडसावल
आपलं राजकारण

जरा भान ठेवा, आपण कुत्री, मांजर, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी आमदारांना खडसावल


विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुरूवातीला विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणेदेखील भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सभागृहात येताच, नितेश राणे यांनी म्याव असा आवाज देण्यात आला.

नितेश राणे यांच्या या कृतीवर महाविकास आघाडीच्या आमदारांना आक्षेप घेतला आणि नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली. भाजपा आमदारांनी देखील ही गोष्ट मान्य केली, की सभागृहाच्या आवारात वावरताना काही नियम पाळायला हवेत. सभागृहात वावरताना कोणते नियम पाळावे यांची एक नियमावली देखील जाहीर करण्यात आली. ही नियमावली जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडली.

आचार संहितेचे पालन करणे सभागृहाच्या प्रत्येक सदस्यांचे कर्तव्य आहे.राज्यातला प्रत्येकजण विधिमंडळातील वर्तनावर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे आपण जबाबदारीने वागले पाहिजे. या सभागृहातल्या सदस्यांना माझी विनंती आहे,गेल्या काही वर्षात आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनामुळे सभागृहाच्या मान सन्माला नक्कीच धक्का बसला आहे. ही प्रतिमा आणखी ढासळू नये. तिला उंचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे,आपण सर्वांनी सभागृहातल्या विधिमंडळाच्या आवारात सार्वजनिक जीवनातल्या स्वताच्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.

आदर्श वर्तन आणि आचारसंहितेचे पालन होण्याबाबत सगळ्यांनी चिंता व्यक्त केली.अजित पवार म्हणाले आम्ही 30 वर्षांपूर्वी आलो त्यावेळी गोष्ट वेगळी होती.त्यावेळी लाईव्ह प्रक्षेपण होत नव्हते.विधि मंडळ आवारात माध्यमांच्या कक्षातून आता प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे सदस्यांनी देखील शोभेल असेच वर्तन करावे. इतरांचा अपमान आणि अवमान होणार नाही असे असावे. एका गोष्टीची मला खंत वाटते. मी माझी मते स्पष्टपणे मांडत असतो, त्यामध्ये कधीच पक्षीय राजकारण आणत नाही. पण संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे, तुम्ही सभागृहात येतात, तुम्हाला लाखों मतदारांनी त्यांचे प्रतिनिधीत्व करत. कुत्री, मांजर, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधत्व करत नाहीत. याची जाणीव ठेवली पाहिजे.

माझी सर्वांना विनंती आहे. विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणे हा सभागृह सदस्यांचा आणि मतदारांचा विश्वासघात आहे. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी तिथे जाऊन असे आवाज काढतो, टवाळी करतो यावर मतदारांना काय वाटेल.त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. अशी प्रती क्रिया अजित पवार यांनी दिली.