चंद्रपूर जिल्ह्यातील रत्नापुर या लहानशा गावातील आदिनाथ अविनाश लोधे हा थेट दुबईला जाणार आहे. आदिनाथ युथ टॅलेंट स्पोर्टस असोसिएशन इंडियन नॅशनल लिगसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली आहे. दुबईत पाच दिवसीय सामने व तीन टी 20 सामन्यासाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली आहे. दुबईत पाच दिवसीय सामने व तीन टी 20 सामने यासाठी भारतीय संघ खेळणार आहे.
आदिनाथला आयएनसीएलने आदिनाथला पत्र देखील पाठविले जात. आदिनाथला त्यांच्या कामगिरीबद्दल आठ हजार रुपये इतके प्रायोजकत्व देखील मिळाले आहे. जर त्याने दुबईत उत्तम काम केले तर त्याला धावा आणि विकेट्स याआधारे आर्थिक मोबदला देखील मिळणार आहे.
इतकेच नव्हे तर आयएनसीएल गोल्ड कप, मेहमान नवाझी ट्रॉपी आणि बेटी बचावो टी 20 ट्रॉपी खेळता येणार आहे. यासाठी त्याला कोणतीही किंमती मोजावी लागणार नाही उलट त्याला लीलावत जी रक्कम मिळणार आहे, त्या अनुषंगाने ही निवड करण्यात आली आहे.
रत्नापुर येथील आठ हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात बहुतांशी सर्व नागरिक शेती करतात,शेतीवर आधारित व्यवसाय केले जातात. येथील शेतकऱ्यांचा मुलगा आदिनाथ लोधे यांनी क्रिकेटमध्ये कौशल्य दाखवत उंच भरारी घेतली आहे. गावामध्ये अनेक क्रिकेट क्रिकेट सामने भरविले जात, यातूनच त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली.
तो बांधावर देखील क्रिकेट खेळायचा. त्याच्या मेहनतीचे फलित म्हणून त्यांची क्रिकेट संघात निवड झाली अशी प्रतिक्रिया त्यांच्या आई-वडीलांनी व्यक्त केली