जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस काहीही करू शकतो. किती जरी प्रतिकूल परिस्थिति असू द्या, ज्याचं ध्येय पक्क असतं ते त्यांच्या ध्येया पर्यन्त जाऊन पोहचतात. भारतात आयपीएल सुरू झालं आणि अनेक नवीन खेळाडू आपल्या देशाला मिळाले. आयपीएलमुळे टॅलेंट मोठ्या प्रमाणात समोर आलं.
23 मे पासून आता महिला आयपीएल सुरू होणार आहे. यामध्ये अनेक महिला क्रिकेटर आपल्याला दिसणार आहेत, पाथर्डी येथील शेतकऱ्यांची पोरं आता आयपीएलचं मैदान गाजविणार आहे. आरती केदार हीची 23 मे पासून सुरू होणाऱ्या महिला आयपीएलसाठी निवड झाली आहे. आरती ही पाथर्डी तालुक्यातील पहिली महिला क्रिकेटर ठरणार आहे.
आरतीने पाथर्डी येथील एस वी नेट अकॅडमी मधून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. आरतीने तीचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. माध्यमिक शिक्षण देखील तीने तिथूनच पूर्ण केले आहे. आरती सध्या पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.