क्रिकेट आणि मैदानावर होणारे रेकॉर्ड ही नेहमी चर्चा होणारी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मैदानावर नवीन रेकॉर्ड होतात, त्यामागे एक खास स्टोरी असते. आता हेच पाहा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड दूसरा कसोटी सामना सुरू होता. आणि एजाजने एक नवीन रेकॉर्ड केलाय.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना जाहीर झाला आणि एक नाव भलतंच चर्चेत आलं, ते नाव म्हणजे एजाज पटेल, एजाज चर्चेत असण्याचं कारण म्हणजे एजाजचा जन्म मुंबईतला पण जन्मानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झाले. त्यांनी तेथील नागरिकत्व स्वीकारले. पण क्रिकेट हे रक्तातंच असतं, प्रत्येक भारतीयांच्या रक्तात क्रिकेट आहे.
एजाजच्या रक्तात देखील ते दिसून येते. एजाजने कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्व 10 बळी घेतले. एजाज जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडचा जीम लेकर, भारताचा अनिल कुंबळे आणि तिसरा ठरला तो एजाज. एजाजने जेव्हा दहावी विकेट घेतली तेव्हा विरोधी भारतीय खेळांडु देखील उभा राहून एजाजचे अभिनंदन करत होते. विशेष म्हणजे एजाज त्यांच्या कर्मभूमीवर म्हणजे न्यूझीलंडमध्ये एक ही विकेट घेतलेली नाही. पण एजाजने त्यांच्या जन्मभूमीवर चांगलाच जलवा दाखविला आहे.