Home » कॅप्टन कूल धोनीचा इंडियन जर्सिला रामराम! वाचा ‘ती’ अफलातून टोल्ड स्टोरी
Sports खास किस्से खेळ-कुद

कॅप्टन कूल धोनीचा इंडियन जर्सिला रामराम! वाचा ‘ती’ अफलातून टोल्ड स्टोरी

भारतीय क्रिकेट विश्वात यशस्वी कॅप्टन म्हणून सौरव गांगुलीनंतर धोनीला पसंती देण्यात येते. नुकतीच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 15आॅगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली आहे. परंतु धोनीची लोकप्रियता नवी नसून कारकिर्दीच्या सुरुवातीला लांब केस वाढवलेला हीटर अशी त्याची ओळख होती. बेधडक चौकार, षटकार लावणारा धोनी विकेट किपींग करताना, हार्ड स्टंपिंग आणि अफलातून झेल घेत असे. धोनीच्या हेलीकॉप्टर शॉटवर कित्येक क्रिकेट चाहते फिदा आहेत. धोनीची आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कूल आणि स्मार्ट अशी ओळख आहे. मैदानावर कधीही चिडचिड न करणारा धोनी कॅप्टन म्हणून पण कूल संबोधला जातो अनेक चुरशीच्या मॅचमध्ये धोनीने स्वताचा संयम दाखवत मॅच विनींग कॅप्टन्सी केली आहे.

मैदानावर नेहमीच धोनीची प्रतिमा कॅप्टन कूल राहिली आहे. धोनी नेहमीच त्याच्या खेळाडूंवर विश्वास दाखवत आलेला आहे. मॅच कितीही क्रिटीकल सिच्युएशनमध्ये असली तरी धोनी स्वताचा कूल दृष्टिकोन सोडत नाही. अशावेळी खेळाडूंचा आत्मविश्वास कायम राहावा यासाठी तो प्रयत्नशील दिसतो.धोनी सतत व्यूहरचना बदलत राहतो. कॅप्टन्सी करतानाच त्याच्या वैयक्तिक किपींग व बॅटींगचा परफॉर्मन्स विचारात घेतला तर त्याच्या कूल स्वभावाचा अंदाज येतो. ४ नंबरला बॅटींगला येणार्‍या धोनी अनेकदा मॅच विनींग खेळी केली आहे. धोनी विजयाला जितक्या जल्लोषाचे स्वीकारतो तितक्याच जबाबदारीने तो पराभव ही मान्य करताना दिसून येतो. या कारणांमुळेच धोनी कॅप्टन कूल ठरतो.

धोनीचा मॅच विनींग स्मार्टनेस

२००७ मध्ये बीसीसीआयने जेव्हा एमएसची निवड टी 20 वल्डकपसाठी कॅप्टन म्हणून केली तेव्हा सगळ्या क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. नवोदीत युवा धोनीच्या कॅप्टन्सीत नवी युवा टिम निवडली गेली होती. प्रत्येकजण या कपसाठी आणि भारताच्या परफॉर्मन्ससाठी उत्सुक होता. नवा कॅप्टन आणि नवी टीम कशी खेळेल याबाबत बरेचजण साशंक होते, परंतु धोनीचा स्मार्टनेस, निडर खेळ यामुळे हि सिरीज यादगार ठरली.हि सिरीज खेळताना भारत लिग मॅचमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध मॅच खेळत होता. नेहमीप्रमाण भारतीय क्रिकेट टीमसाठी ही मॅच जिंकण प्रतिष्ठेसाठी तसेच चाहत्यांना खुष करण्यासाठी जितक गरजेच होत तितकच गुणतालिकेतील अग्रस्थान टिकवण्यासाठी व पुढच्या स्टेजला क्वालिफाय करण्यासाठी ही मॅच जिंकण जरुरी होत. ही मॅच अत्यंत रोमांचक स्थितीत पोहोचली आणि १४१ रन्सचा पाठलाग करणार्‍या प्रतिस्पर्धी पाकीस्तान टीमन ही मॅच टाय केली. अंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वप्रथमच ही घटना घडली आणि टाय बॉलवर आऊट करत भारताने हि मॅच जिंकली.

नुकत्याच झालेल्या इंटरव्ह्यू दरम्यान रॉबीन उथप्पान धोनीच्या कॅप्टन्सी व्यूहरचनेच कौतुक करताना या मॅचच्या आठवणी ताज्या केल्या. तो एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, “प्रतिस्पर्धी कामरान अकमल किपिंगला नेहमीप्रमाण स्टंपच्या काही फूट मागे उभ राहायचा. धोनीन मात्र स्टंपच्या बरोबर माग उभ राहत किपिंग केल. परिणामी बॉलरनी धोनीवर विश्वास ठेवत एकाग्रतेने बॉलिंग केली आणि फिल्डरना विकेट हिट करण्याची संधी मिळाली. आम्ही धोनीच्या स्मार्ट व्यूहरचनेप्रमाणे परफॉर्म केल आणि मॅच जिंकली.” यासाठी वरच्या दोन चित्रात बघितल तर कामरान अकमल व एमएस धोनीची किपिंग पोझीशन लक्षात येते. धोनीने हा पवित्रा घेण्याबरोबरच बॉलरना सूचना दिल्या कि, बॉलिंग करताना त्याच्या पोझीशनकड लक्ष देत त्यानुसार बॉलिंग टाकायची आहे. धोनीचा हा स्मार्ट विचार आणि त्याची अंमलबजावणी यामुळे हि मॅच जिंकता येण शक्य झाल होत. २००७ मध्ये धोनीने कॅप्टन म्हणून प्रथमच टि 20 वल्डकप आयसीसी जिंकून चाहत्यांची मन जिंकली.त्यानंतर अनेक मॅचमध्ये धोनीने स्वताचा स्मार्टनेस आणि संयम वापरत व्हीक्टरी मिळवली.बरेचदा त्याला लकी संबोधल जात, तसही असेल कदाचित. परंतु वरील घटनेवरून आणि त्याच्या करियर विनींग ग्राफवरुन तो स्मार्ट आणि कूल कॅप्टन होता हे मान्य कराव लागत.

About the author

Shyam Hajare

Add Comment

Click here to post a comment