एका झटक्यात नोटबंदी करून सगळ्यांची झोप उडाली तशीच झोप पुन्हा उडू शकते असं जाणकारांचं म्हणन आहे..
मोदी सरकार सत्तेत आलं आणि एकसे एक धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात झाली. एक दिवस अचानक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला आणि सर्वांची झोप उडाली. मोदीनी त्या वेळी चलनात असलेल्या 500 व 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी संपूर्ण देशात एकच गदारोळ माजला.
नोटबंदी झाली,आता नवीन कोण- कोणत्या नोटा चलनात येणार यांची सर्वाना उत्सुकता होती. त्यात भाजपाच्या एका नेत्याने एक स्टेटमेंट दिलं की येणाऱ्या नोटांमध्ये चिप असणार आहे. ही चिप अतिशय पॉवरफूल असणार आहे. नोटा पुरल्या तरी त्या सहज सापडणार आहे. मग काय देशांत एकच गोंधळ नवीन येणाऱ्या नोटांमध्ये चिप असणार आहे.
अखेर जोरदार गाजावाजा करत 500 व 2000 हजारांच्या नोटा चलनात आल्या. आधी 1000 हजार रूपये चलनातील सर्वात मोठी नोट होती. पण मोदी सरकारने थेट 2000 हजारांची नोट बाजारात आणली मग काय. गुलाबी रंगाची 2 हजारांची नोट चर्चेचा विषय बनली.
गुलाबी मुलींचा आवडता रंग आणि त्यात 2 हजारांची सर्वात मोठी नोट मग काय मुली देखील खुश झाल्या. काहीना ही 2 हजारांची नोट तितकी पटली नाही. 2017- 2018 सालात 2000 हजारांच्या नोटा सर्वाधिक चलनात होत्या. पण हळूहळू 2000 हजारांची नोट बाजारात कमी दिसू लागली.
2019 पासून तर 2 हजारांच्या नोटा छापल्या गेल्या नाहीत. कारण काळा पैसा रोखला जावा यासाठी. तसा विचार केला तर 2 हजारांची नोट 2019 साली चलनातून बाद झाली पण केंद्र सरकारने मात्र अजून अधिकृत घोषणा केली नाही. सध्या देशांत 500 आणि 10 रुपयांच्या सर्वाधिक नोटा आहेत.सरकारचं हे देखील म्हणणं आहे की जितकं मोठं चलन तितका अधिक छपाईचा खर्च अधिक.त्यामुळे 2000 हजारांची नोट आता चलनातून विरळ झाली आहे.केंद्र सरकार हळूहळू सर्व 2 हजारांच्या नोटा चलनातून काढून घेणार आहे. अशा प्रकारे 2 हजारांची नोट आपल्यामधून न कळत गायब होणार आहे.