LIC चा आयपीओ बाजारात येणार आहे, त्यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष या आयपीओ कडे लागले आहे. LIC ही भारतातील तसेच जगातील सर्वात मोठी पॉलीसी कंपनी आहे. LIC चे भारतात 13 लाख 6 हजार LIC एजंट आहेत. LIC ने आता पर्यत 28.6 कोटी रुपयांच्या पॉलिसी विकल्या आहेत. त्यांचे 1 लाख कर्मचारी काम करतात.
LIC चा बाजारात आयपीओ आला आणि स्टार LIC एजंट असलेल्या भरत पारेख यांची चर्चा सुरू झाली. भारत पारेख हे LIC एजंट आहेत. ते एलआयसीच्या माध्यमातून इतके कमिशन मिळवतात की त्यांची कमाई ही एलआयसी चेअरमन पेक्षा अधिक आहे. भरत पारेख हे नागपूरचे आहेत. ते इतर उत्साही LIC एजंट प्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या पॉलिसीची माहिती देतात. त्यांनी आता पर्यंत 32.4 कोटी किमतीच्या पॉलिसी विकल्या आहेत.
पारेख हे संपूर्ण जगात असलेल्या पॉलिसी कंपन्याची एक संघटना आहे, त्यांचे देखील ते सदस्य आहेत. ते तेथे देखील स्टार LIC एजंट म्हणून भाषण करत असतात. त्यांनी त्यांच्या या अनुभवाचे एक पुस्तक देखील काढले आहे. भारत पारेख यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली तब्बल 35 लोक काम करतात. त्यांची पत्नी देखील LIC एजंट आहे.
वय वर्ष 18 असल्यापासून पारेख हे काम करतात. पारेख याचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे ते ज्या ग्राहकांच्या घरी जातात तेव्हा ते त्यांची घरातील भाषा बोलतात. पारेख यांचे 40 हजार LIC पॉलिसी होल्डर आहेत. ते त्या सर्वांचे सर्व रेकॉर्ड ठेवतात. त्यानं त्यांच्या वाढदिवशी मेसेज करतात. पारेख तंत्रज्ञाचा सर्वाधिक वापर करतात, त्यामुळे त्यांच्याकडे सर्व रेकॉर्ड लगेच सापडतात.