भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत (general bipin rawat) यांच्या हेलीकॉफ्टरचा उटीला जात असताना कुन्नूरच्या जंगलात अपघात झाला. या अपघातात रावत जखमी झाले आहेत. या अपघाताच्या बातमीने संपूर्ण देशांत एकच खळबळ माजली. या घटनेनंतर सर्वान समोर एकच प्रश्न उभारला कोण आहेत बिपिन रावत?
बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. त्यांचे वडील एल.एस रावत हे देखील लष्करात होते (Indian Army). ते देखील लेफ्टनंट जनरल एल.एस रावत म्हणून ओळखले जात. वडील लष्करात असल्यामुळे बिपिन देखील त्या शिस्तीत वाढले आणि पुढे ते देखील लष्करात दाखल झाले.
बिपिन यांची कामगिरी पहिल्यापासूनच चमकदार आहे. त्यांनी लष्कर अकादमीत देखील जोरदार कामगिरी केली. त्यांची कामगिरी पाहून त्यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे सन्मानपत्र दिले गेले. त्यांनी भारतीय लष्करात गोरखा 1 रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा लष्करी जवान म्हणून काम केले. लष्करात त्यांनी अनेक पदावर काम केले. त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी अनेक पुरस्कार आणि पदंक देखील त्यांना मिळाली आहेत.
परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक,युद्ध सेवा पदक अशा पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जनरल रावत 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले. तेव्हा ते 63 वर्षाचे होते. लष्करात निवृत्त होण्याची वयोमर्यादा 65 इतकी आहे.
रावत हे पंतप्रधान मोदी यांच्या जवळचे मानले जातात. तिन्ही संरक्षण दलाचे समन्वय साधण्यासाठी एक एका पदाची निर्मिती करण्यात आली. हे पद म्हणजे चीफ ऑफ डीफेन्स. मोदी आणि मंत्री मंडळाने या पदाला मान्यता दिली आणि रावत यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली.1999 सालापासून हे पद निर्माण केले जावे अशी मागणी केली जात होती, अखेर 2019 साली या पदाला मान्यता मिळाली.
बिपिन रावत हे पहिले सीडीएस झाले. त्यांनी पदभार स्वीकारून आता दोन वर्ष झाली आहेत. रावत यांनी जेव्हा पदभार स्वीकारला होता, तेव्हा मोदींनी त्यांचे ट्विटरवर अभिनंदन देखील केले होते. सीडीएस पंतप्रधान आणि तिन्ही सैन्यदल यांच्या मध्ये दुवा साधण्याचे काम करतात.