Home » जगप्रसिद्ध चितळे बंधूंची बाकरवडी सुद्धा मूळ गुजराती रेसिपी आहे..
काय चाललंय?

जगप्रसिद्ध चितळे बंधूंची बाकरवडी सुद्धा मूळ गुजराती रेसिपी आहे..

चितळे म्हटलं की पुणे आणि पुणे म्हटलं की चितळे हे समीकरण आपल्या समोर उभं राहतं. चितळेचं दूध, चितळेची आंबा वडी आणि चितळेची बाकरवडी हे जगप्रसिद्ध आहे. आज कित्येक वर्ष झाली तरी चितळेच्या बाकरवडीची चव मात्र बदलली नाही. पण तुम्हाला हे माहीत आहे का? चितळेना बाकरवडीची रेसिपी कशी काय सुचली. त्याचं झालं असं की चितळे अनेक वर्षांपासून दुधाच्या व्यवसायात होते पण त्यांना त्यातून म्हणावा तितका नफा मिळत नव्हता.

1954 साली भाऊसाहेब चितळे आणि त्यांचा लहान भाऊ राजाभाऊ या दोघांनी पुण्यात मिठाईचे दुकान उघडण्याचे ठरविले. डेक्कन जिमखाना येथे त्यांनी मिठाईचे दुकान उघडले, सुरुवातीला त्यांनी तेथे, शेव, आंबावडी असे पदार्थ विकायला सुरुवात केली. या बरोबरच चक्का, श्रीखंड असे दुधाचे पदार्थ देखील विकत, पण 8 ते 10 वर्ष झाली तरी त्यांच्या या व्यवसायात तितका नफा मिळत नव्हता, पण त्यांनी त्यांच्या चव आणि क्वालिटीमध्ये कोठेही बदल केला नाही.

रघूनाथ चितळे एकदा, कामानिमित्त गुजरातला गेले होते. तेथे त्यांनी एका मिठाईच्या दुकानात बाकरवडी टेस्ट केली. त्यांना त्या मिठाईची चव आवडली. पण गुजराती बाकरवडी ही चवीला थोडीशी गोड होती. आपल्या महाराष्ट्रात अशी गोड चव इतकी आवडली नसती. नागपूर साइडला बाकरवडी सारखी पुढाची वडी बनविली जाते, पण पुढाची वडी मात्र फार झणझणीत असते. मग चितळेनी पुढाची वडी आणि गुजराती बाकरवडी एकत्र करून चितळे बाकरवडी बनविली.

अशा प्रकारे चितळेची बाकरवडी बनली. चव एकदम परफेक्ट बनली. आज देखील बाकरवडीची चव अगदी तशीच्या तशी आहे. बाकरवडी जरी गुजराती असली तरी चितळेची बाकरवडी मात्र 100 टक्के पुणेरी चवीची आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाही.