साधा रिक्षाचालक ते 3 हेलीकॉफ्टर मालक, पुण्यातील अविनाश भोसलेंची थक्क करणारी स्टोरी
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर, उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआय अटक केली आहे. अविनाश भोसले एक सामान्य युवक संगमनेर सारख्या छोट्या शहरातून पोटापाण्यासाठी पुण्यात आला.रास्ता पेठेत राहू लागला.सुरुवातीला एक रिक्षा चालक म्हणून काम करून लागला. नंतर स्वताची रिक्षा घेतली,पण आज त्या माणसांकडे स्वताच्या मालकीची 3 हेलीकॉफ्टर आहेत, अलीशान बंगला आहे. खुद्द अविनाश भोसले यांनी देखील स्वता इतके मोठे होईल हे स्वप्न पाहिले नसेल.
अविनाश रिक्षा चालक असले तरी ते हुशार होते. लोकांशी चांगले संबंध निर्माण करणे त्यांना माहीत होते. हळूहळू त्यांनी बांधकाम व्यवसाय स्वताचा जम बसवायला सुरुवात केली. त्यांच्या सासऱ्यांच्या मदतीने अनेक कंत्राटे त्यांनी मिळवली. गोष्ट त्यावेळीची आहे, जेव्हा युती सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील काही दुष्काळग्रस्त भाग ओलीताखाली आणण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन केले. त्यांची कामे कंत्राटपद्धतीने देण्यास सुरुवात झाली.
आधी इतर राज्यांतील कंत्राटदारे ही कंत्राटे घेत पण अविनाश भोसले यांनी यामध्ये पाऊल ठेवले. यासाठी त्यांनी सर्व राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध ठेवण्यास सुरुवात केली. नेत्यांना प्रचारासाठी स्वताची गाडी देणे असो की पुढे हेलीकॉफ्टर सारं काही अविनाश भोसले करत. त्यांना या गोष्टीचा प्रचंड फायदा झाला.
बाणेर येथे व्हाइट हाऊस हा अलिशान बंगला देखील अविनाश भोसले यांनी बांधला. महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर बाळासाहेब ठाकरे स्वता अनेकदा राहायचे. इलेक्शनच्या काळात महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांना अविनाश भोसले यांच्या गाड्या आणि हेलिकॉफ्टर देत असतं.
अविनाश भोसले यांची संपत्ती वाढत चालली होती. कोरगाव पार्क येथे अविनाश भोसले यांनी एक हॉटेल चालू केले, त्या हॉटेलच्या उद्घाटनाला त्यावेळीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह कित्येक बडे नेते आले होते. 2017 साली सर्वात प्रथम इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरावर छापेमारी केली. तेव्हा पासून अविनाश भोसले यांच्यावर कारवाया सुरू आहेत.