Home » शिवभोजन योजना म्हणजे शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांच्या उत्पन्नाचे साधन – फडणवीस
काय चाललंय?

शिवभोजन योजना म्हणजे शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांच्या उत्पन्नाचे साधन – फडणवीस

शिवभोजन थाळी या योजनेते मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहेच. चित्रा वाघ यांनी देखील ठाकरे सरकार यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आता त्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक आरोप केले आहेत.

फडणवीस म्हणतात,एकाच ग्राहकांचे फोटो लावून छायाचित्रात वेगवेगळी नावे वापरली जात आहेत. सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेचे पैसे लाटण्याचे प्रकार सुरू आहेत, असे म्हणणे फडणवीस यांचे आहे.

शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांच्या उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू आहे. शिवाजी महाराज यांच्या नावे योजना सुरू करून त्यात भ्रष्टाचार केला आहे. हा शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान आहे. असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकशाही कुलपबंद केली आहे. राज्यात लोकशाही नाही तर रोकशाही आणि रोखशाही सुरू आहे.असा घणाघात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे .राज्यात अधिवेशनात भाजपच्या आमदारांचं संख्याबळ कमी व्हावं यासाठी वर्षभर त्यांना सस्पेंड केल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.

संसदेचं अधिवेशन इतका काळ चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी वेळ अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाही जेवढं कुलूप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात, पण महाराष्ट्रात ही मानसिकताच नाही.

या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारने आता रोकशाही सुरू आहे. रोखशाही म्हणजे थांबविणे आणि या सरकारचे हे थांबविण्याचे काम सुरू आहे. फडणीवस म्हणाले स्थगिती, खंडणी लूट, भ्रष्टाचार हे सर्व प्रकार या सरकारमध्ये पाहायला मिळत आहेत. ते कधीच पाहिले नव्हते. विरोधकांनी बोलू नये म्हणून त्याचं वर्षभर निलंबन केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अक्षरश काळिमा फासण्याचं काम होत आहे. ज्या घटना घडल्याच नाहीत त्याचं कारण पुढं करून आमच्या आमदारांना निलंबीत केलं आहे.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला उद्या पासून सुरुवात होत आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदा उपस्थिती राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रस्क्रिया पार पडली आहे. त्यांनी याआधी विडियो कॉन्फरन्सद्वारे मीटिंगला हजेरी लावली आहे मात्र आज पहिल्यांदाच ते चहापानास हजेरी लावणार आहेत.