Home » मी स्वतः निवडणून आलो तेव्हा देखील इतका आनंदी नव्हतो जितका आज आहे- फडणवीस
काय चाललंय?

मी स्वतः निवडणून आलो तेव्हा देखील इतका आनंदी नव्हतो जितका आज आहे- फडणवीस


चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेवाल यांचा विजय ही महाविकास आघाडीला मिळालेली चपराक आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस एकत्र आले म्हणजे विजय निश्चित असं नाही, राजकारणात फक्त गणितच नाही तर केमिस्ट्रीही चालते. असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तीन पक्ष एकत्र आले म्हणजे विजय होते असे नाही. आजच्या निकालाने हे सिद्ध झालं, राजकारणात केवळ गणित चालत नाही, केमिस्ट्री देखील असायला हवी. मी स्वता निवडून आलो तेव्हा देखील मला इतका आनंद झाला नव्हता तितका आनंद आज झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे (nagpur vidhan parishad election).

अकोल्यात वसंतराव खंडेलवाल यांनी निर्णायक विजय मिळवला आहे.एकूण विधान परिषद निवडणुकीत चार जागी भाजप विजयी झाले आहे. तीन पक्ष एकत्र म्हणजे विजय हे गणित चुकीचे आहे. जनता भाजपच्या पाठी आहे. जनतेला भाजपला आशीर्वाद मिळेल. आता ही विजयाची सुरुवात आहे (devendra fadnavis).

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महापालिकेची तयारी केली आहे. भाजपा महापालिका निवडणुकीत चांगल्या फरकाने विजयी होईल. भाजपा पालिकेत एक नंबरचा पक्ष होईल. नागपूर आणि अकोल्यात महाविकास आघाडीची मते आम्हाला मिळाली आहेत,महाविकास आघाडीच्या मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत.

कॉँग्रेसच्या उमेदवाराला एकच मत मिळालं आहे. खरं तर ते कॉँग्रेसमध्ये केले हीच त्यांची चूक झाली आहे. कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते.