महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात (Maharashtra VidhanSabha Winter Season 2021) ‘म्याव-म्याव’ हा विषय खूपच चर्चेचा ठरलं. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनास बसलेले मंत्री आदित्य ठाकरे यांना विधानभवनात येताना बघून म्याव-म्याव असा आवाज काढला. यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात जोरदार जुंपलेली पाहायला मिळाली.
आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार ताशेरे ओढले. ‘आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली?’ असा सवालही नारायण राणे यांनी केलाय.
नितेश राणे यांनी काढलेल्या मांजरीचा आवाज यावर त्यांना पत्रकाराने प्रश्न केल्यावर नारायण राणे चांगलेच भडकले. भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करण्यासाठी सूडभावनेचा वापर केला जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.
नितेश राणे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पुढे राणे यांनी उत्तर देताना म्हटलं, ‘मांजराचा आवाज कोण काढत? ज्यामुळे आदित्य ठाकरे चिडले. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे हे जात असताना कुणी मांजरीचा आवाज काढला जरी, आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तस बोलतात का? मांजरीचा आवाज काढल्यावर त्यांना राग का यावा?’ अस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी पत्रकारांना म्हटलं.