Home » ‘‘आम्हाला नातवंड पाहिजे, नाहीतर 5 कोटी द्या..’’ आई-वडिलांची मुलाकडे अजब मागणी
काय चाललंय?

‘‘आम्हाला नातवंड पाहिजे, नाहीतर 5 कोटी द्या..’’ आई-वडिलांची मुलाकडे अजब मागणी

आई – वडील आयुष्य भराची सर्व कमाई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना उत्तम नोकरी लागावी, त्याचं लग्न व्हावं यासाठी खर्च करतात, मुलांच्या पुढे त्यांना कोणत्याच गोष्टी महत्वाच्या वाटतं नाहीत, ते मुलांसाठी स्वताचा सर्व कमाई खर्च करतात. पण मुलं शिकतात, लग्न करतात आणि त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात, आई- वडिलांचा त्यांना विसर पडतो.

आई- वडिलांनी आपल्यासाठी काय केले हे ती विसरून जातात. शेवटी आई -वडिलांना त्यांच्या मुलांना आठवण करून द्यावी लागते की, त्यांनी त्यांच्या मुलासाठी काय केले आहे. अशीच काही घटना उत्तराखंड येथील एस.आर प्रसाद यांच्याशी घडली.

त्यांनी कोणताही विचार नकरता, मुलांच्या शिक्षणांसाठी सर्व पैसे खर्च केले. मुलांचे २०१६ मध्ये मोठ्या हौशीने लग्न लावून दिले, पण लग्नाला सहा वर्ष होऊन देखील त्यांच्या मुलाने आणि सुनाने त्यांना नातवाचे अजून तोंड देखील दाखविले नाही.

प्रसाद पती – पत्नीला या गोष्टीचे फार दुख झाले. त्यांनी मुलाला आणि सुनेला कोर्टात खेचले. नातू असो किंवा नात आपल्याला काहीही चालेल पण आम्हाला त्यांचे तोंड पाहायचे आहे, नातवंड द्या नाहीतर पाच कोटी अशी मागणी प्रसाद यांनी केली आहे. त्यांचा हा खटला दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे.

या खटल्यामुळे समजाचे भीषण वास्तव समोर आले आहे, आजची तरुण पिढी ही स्वार्थी झाली आहे, ते फक्त स्वताचा विचार करतात. आई – वडिलांनी मुलांसाठी किती तरी गोष्टीचा त्याग केले आहे, हे त्यांच्या लक्षात देखील येत नाही.