Home » हनुमानांचा जन्म महाराष्ट्रात कि कर्नाटकात झाला यावर वाद सुरुये, इतिहास काय सांगतो?
काय चाललंय?

हनुमानांचा जन्म महाराष्ट्रात कि कर्नाटकात झाला यावर वाद सुरुये, इतिहास काय सांगतो?

हनुमान हा सच्चा राम भक्त होता. भगवान श्रीराम यांच्यावर त्यांची एकनिष्ट भक्ती होती. राम -हनुमान यांच्याबद्दल अनेक गोष्टी इतिहासात देखील आहेत. हनुमानाने रामासाठी काय- काय केले हे देखील आपण जाणतो, पण सध्या एक मुद्दा प्रचंड चर्चेत आला आहे. हनुमानांचा जन्म कोठे झाला. या आधी हा वाद कर्नाटक आणि आंध्रप्रदेश यांच्यामध्ये सुरू होता पण आता आपल्या महाराष्ट्राने देखील या वादामध्ये उडी घेतली आहे.

कर्नाटकमधील लोकांचे म्हणणे आहे की हनुमानांचा जन्म हंपी जवळील अंजेयानाद्री टेकडीवर झाला. मात्र आंध्रप्रदेशातील लोकांनी हा दावा केला आहे की हनुमानाचा जन्म तिरूमलांच्या सात टेकड्यांमध्ये असलेल्या अंजनाद्री टेकडीवर झाला आहे. पण आता महाराष्ट्रातील नाशिक मधील नागरिकांनी हा दावा केला आहे की, हनुमानाचा जन्म हा नाशिक जवळील अंजनेरी डोंगरावर झाला आहे.

नाशिकविषयी आपल्या येथे असा विचार केला जातो की सीतेचे अपहरण नाशिकमधून झाले आहे. राम- लक्ष्मण आणि सीता वनवासा दरम्यान पंचवटीमध्ये राहत होते. नाशिकमध्ये रामायणाच्या अनेक खुणा देखील आहेत. काळाराम मंदिर, सीता गुंफा, टाकेद इत्यादी.

नाशिक शहराच्या नावामागे देखील रामायनाचा संदर्भ लावला जातो. लक्ष्मणाने रावणाची बहीण असलेली शुर्पणखेचं नाक देखील येथेच कापले. यावरून या शहराला नाशिक नाव मिळाले. आता या तीन राज्यांचा विचार करता सामान्य लोकांना हा प्रश्न पडत आहे की खरचं हनुमानाचा जन्म कोठे झाला.

तसा विचार केला तर रामायण अनेक भाषांमध्ये आहे. इंडोनेशिया आणि चीनमध्ये देखील रामायणाच्या अनेक खुणा सापडतात. इंडोनेशियामध्ये देखील पंचवटी आहे. हरियाणा आणि गुजरातमध्ये देखील एक वेगळं रामायण आहे. तेथील लोक तिथले दावे करतात. रामायण हे अनेक भाषांमध्ये आहे त्यामुळे ज्या भाषेमध्ये आहे, तेथील नागरिकांनी त्यांच्या जवळील जागेचे संदर्भ दिले आहेत. रामायणामध्ये एखाद्या जागेचा उल्लेख आहे, पण ती जागा नेहमी कोठे होती यांचा उल्लेख नाही.

त्यामुळे नावे सेम असलेल्या अनेक जागा देशभरात आहेत. तेथील स्थानिक लोक तेथील जागांचा दावा करतात. त्या प्रत्येक जागेशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याला अधिक महत्व प्राप्त होते. ज्यांना ज्यांना रामायण भावलं त्यांनी त्यांनी ते आपल्या भाषेत आपल्या येथील जागांचा संदर्भ देऊन वर्णन केलं. अशाप्रकारे असे वाद निर्माण झाले आहेत.