Home » हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार-अंकिताच्या लग्नाला नेत्यांची हजेरी
काय चाललंय?

हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार-अंकिताच्या लग्नाला नेत्यांची हजेरी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार यांचा विवाह हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हिच्यासोबत पार पडला. मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस इथे हा लग्नसमारंभ मोठ्या थाटात पार पडला. अनेक बड्या राजकीय नेत्यांनी देखील या विवाहास हजेरी लावली होती. अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा माध्यमांमध्ये सुरु होती.

निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. तर अंकिता पाटील ह्या सध्या पुणे जिल्हापरिषदेच्या सदस्य आहेत. अंकिता यांनीही लंडनला इकॉनॉमिक मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल आहे. दरम्यान दोघांची १ वर्षासाठी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना ओळख झाली.

हर्षवर्धन पाटील सध्या जरी भाजपात आहेत, पण त्यांची कन्या अजूनही कॉंग्रेसमध्येच आहे. परदेशात शिक्षण पूर्ण केलेल्या अंकिता पाटील ह्या इंडियन शुगर मिल्स असोसियेशन नवी दिल्ली च्या सदस्या देखील आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या मातोश्री रत्नप्रभा पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बावडा-लाखेवाडी गटाच्या निवडणुकीत त्या विजयी होऊन जिल्हापरिषद सदस्या झाल्या आहेत.

निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे दोघेही पुत्र निहार ठाकरेंचे सख्खे काका तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत काका आहेत.