Home » मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी, टोपेंची मोठी घोषणा
काय चाललंय?

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी, टोपेंची मोठी घोषणा


मराठा आरक्षणासाठी (maratha aarakshan) बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले, मागील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं होतं.

वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता योग्य ठिकाणी नोकरी देण्यात यावीयासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. असे टोपे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने मागील महिन्यांत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत केली होती. 34 युवकांच्या कुटुंबीयांना अशी मदत करण्यात आली होती. त्या लाभार्थी युवकांची यादी राजेश टोपे यांनी ट्वीटरवर शेअर केली होती.