Home » केतकीच्या त्या वादग्रस्त पोस्टबद्दल धक्कादायक माहिती समोर
काय चाललंय?

केतकीच्या त्या वादग्रस्त पोस्टबद्दल धक्कादायक माहिती समोर

अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट केली आणि संबंध महाराष्ट्रात एकच वादळ उठलं. केतकी हिने शरद पवार यांच्यासाठी जी कविता पोस्ट केली त्या कवितेत अतिशय खालच्या पातळीच्या शब्दांत पवार यांच्यावर टीका केली आहे. केतकी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तिला 18 मे पर्यत पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे. केतकीने जी कविता शेअर केली आहे, ती कविता केतकीने स्वता केलेली नाही. केतकीने केलेल्या पोस्ट खाली तीने त्या कवितेचे सर्व क्रेडिट अॅड.नितीन भावे नामक व्यक्तीला दिले आहे.

केतकीला कोर्टात हजर करण्यात आले होते. तीने वकील न लावता स्वताचा युक्तीवाद स्वता केला आहे. केतकीने ती पोस्ट डिलीट करण्यास देखील नकार दिला आहे. पण केतकीच्या त्या पोस्टबद्दल एक वेगळीच माहिती आता समोर आली आहे, केतकीने पोस्ट केलेली कविता ही 2020 मध्ये पोस्ट करण्यात आली होती पण ती तेव्हा व्हायरलं झाली नाही, पण आता केतकीचा वापर करून ती कविता व्हायरलं करण्यात आली आहे.

त्यामुळे केतकीने खरंच स्वता पोस्ट केली आहे का? तिला ही पोस्ट करण्यासाठी कोणी भाग पाडले आहे? केतकीच्या या पोस्ट मागे कोण आहे आता हा प्रश्न विचारला जात आहे. काल पोलिसानी केतकीच्या घरातून काल मोबाइल, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. आता केतकीच्या त्या पोस्टचा आणि इतरगोष्टीचा तपास सुरू आहे, त्यातून आता काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.