Home » केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टचा इतिहास फार जुना आहे
काय चाललंय?

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टचा इतिहास फार जुना आहे

केतकी चितळे हिच्या वादग्रस्त पोस्टमुळे सध्या सोशल मिडियाचं वातावरण ढवळून निघालय. काल केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते जरा जास्तच आक्रमक झालेत. कळवा पोलीस स्टेशन मध्ये तर तिच्यावर थेट गुन्हा नोंद झालाय. पण मंडळी आता वादात पडण्याची हि तिची पहिलीच वेळ नाहीये. याआधी देखील तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने सोशल मीडियामध्ये बराच राडा झाला होता. पण मग बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतोय कि ही केतकी चितळे नेमकी आहे तरी कोण?

तसं पाहायला गेलं तर तर मराठी आणि हिंदी अश्या दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये केतकीने बर काम केलंय. ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत तिचा महत्वाचा रोल सुरु होता. पण अचानक तिला त्यातून काढून टाकण्याचा निर्णय झाला. त्याच कारण होत केतकीला असणारा एपिलेप्सी नावाचा त्रास. तिने त्याविरोधात आरोप करत आवाज उठवला कि त्यामुळेच मला काढून टाकण्यात आलेलं होत. तिथून ती सोशल मिडीयात जरा जास्तच Active राहून सारखी वादात सापडत गेली.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारी फेसबुक पोस्ट तिच्या अंगलट आली होती. तेव्हाही शिवप्रेमींनी तिला धमक्या दिल्या होत्या. तिने आपल्या “एका विशिष्ट दिवशी त्या समाजातील लोकं केवळ प्रवास मोफत मिळतो म्हणून मुंबई पाहण्याच्या उद्देशाने मुंबईला येतात” असा उल्लेख तिने आपल्या पोस्टमध्ये केल्यामुळे तिच्यावर atrocity दाखल करण्याची मागणी झाली होती.

आणखी एक तीच २०१९ मध्ये गाजलेलं प्रकरण म्हणजे तिने हिंदीतून केलेलं फेसबुक लाइव्ह. यात ओफेंड होण्यासारखं पाहायला गेल तर काहीच अस नव्हत. पण लोकांना तिने बोललेलं हिंदी आवडलं नाही आणि मग काय लोकांनी केतकीला तेव्हाही पुन्हा ट्रोल केलं. तो व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. केतकी चितळेला त्या प्रकरणावर अक्षरशः अश्लील कमेंट्सचा सामना देखील सामना करावा लागला होता. त्यावर उत्तर द्यायचं म्हणून तिने पुन्हा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून शेअर केला जो आणखी व्हायरल झाला आणि लोकांच ट्रोलींग काही कमी झालं नाही. अखेर कंटाळून तिने पोलिसात तक्रार केली. त्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चक्क तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करावी लागली होती.

यानंतर पुढेही केतकी चितळे हिची युनिफॉर्म सिव्हील कोडवर ताशेरे ओढत एक पोस्ट आली. त्यामध्ये तिने तर सगळ्याच धर्मांवर टीका केली होती. तेव्हाही आंबेडकर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हे सगळे होते तिचे याधीचे वाद. मात्र आता नवीन केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आलेल्या केतकीवर दोन धर्मात भांडण लावण्याच कृत्य करणे या कारणामुळे गुन्हा नोंद करण्यात आलाय.

केतकीच्या या प्रकरणावरून तुम्हालाही हे पक्क ध्यानात घ्यायचं आहे कि कुठेही पोस्ट किंवा कमेंट करताना तुमचे शब्द जरा जपूनच वापर. नाहीतर, तुम्हालाही या अडचणीचा सामना करावा लागू शकतो.