पतीचे कोरोनाने निधन झालेल्या विधवा महिलेसोबत तरुणाने लग्न करून प्रेरणादायी काम केलंय. नऊ महिन्यांचे बाळ असलेल्या महिलेसोबत विवाह करून किशोर ढूस यांनी तिला आधार देण्याचं काम केलंय. आणि नवीन आदर्श समाजासमोर ठेवला.
किशोर ढूस (Kishor Dhus) या तरुणाचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Rahiri, Ahmednagar) राहुरी येथील हि आनंदायी घटना आहे. त्यांनी केलेलं हे लग्न अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आज कुठल्याही मदतीऐवजी कोरोनातील विधवा महिलांना आधाराची गरज आहे, जो आधार किशोर यांनी मिळवून दिला.
किशोर यांनी केलेल्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होतंय. सर्वांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी अस मत तहसीलदार एफ आर शेख यांनी व्यक्त केलंय.