Home » मनसेच्या पोस्टरवर ‘जय श्रीराम’, राज ठाकरेंच्या औरंगाबादेत दौऱ्यापूर्वी शहरभर बॅनरबाजी!
काय चाललंय? झाल कि व्हायरल!

मनसेच्या पोस्टरवर ‘जय श्रीराम’, राज ठाकरेंच्या औरंगाबादेत दौऱ्यापूर्वी शहरभर बॅनरबाजी!

मनसे राज ठाकरे आता पुन्हा नव्या जोशाने मैदानात उतरले आहेत. कार्यकर्त्याना उभारी देण्यासाठी राज आज नाशिकमध्ये आहेत, तर उद्या राज औरंगाबाद दौऱ्यावर असतील. राज औरंगाबादेत येणार आहेत, म्हटल्यांवर कार्यकर्ते देखील भलतेच खुश झाले आहेत. राज यांच्या स्वागतासाठी शहरभर बॅनर लावले गेले आहेत. हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत, कारण या बॅनरवर जय श्रीराम चा नारा देण्यात आला आहे.

हे सर्व बॅनर मुस्लिम बहुल भागात लावले गेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात अनेक मोठ्या शहरात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सर्व पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मोठ्या नेत्याचे दौरे सुरू झाले आहेत. राज आज नाशिकात आहेत, नाशिकमध्ये मनसेची ताकद मोठी आहे.

राज यांच्या उपस्थितीत आज अनेक कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार आहेत. राज आज संध्याकाळी औरंगाबादकडे रवाना होतील. उद्या सकाळी ठीक १० वाजता राज यांची कार्यकर्त्याशी बैठक होणार आहे. राज दुपारी एक पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. राज यांनी मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्याची घोषणा केली होती, तत्पूर्वी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मोठी खेळी केली आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला.

या प्रवेशाच्या वेळेस पालकमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थितट होते. राज यांचा औरंगाबाद दौरा अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे, कारण मराठवाड्याचे सर्व राजकारण औरंगाबादवर अवलंबून आहे.