नवजोत सिंह सिद्धू क्रिकेटचे मैदान असो की छोटा पडदा, राजकारणाचा पीच. सर्व ठिकाणी स्वताची वेगळी छाप पाडणाऱ्या सिद्धूला आज कोर्टाने एक वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.1988 साली एका पार्किंगच्या वादातून सिद्धूने एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केली होती. या व्यक्तीला इतकी मारहाण केली होती की त्याला चक्क हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले.
उपचारादरम्यान त्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. मागील 34 वर्षांपासून ही केस कोर्टात सुरू होती. सिद्धूला एकदा दिलासा मिळाला होता, पण हे प्रकरण त्याला महागात पडले होते. सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर सिंह यांच्यावर निर्दोष हत्येचा गुन्हा नोंदविला गेला होता.
1999 साली कोर्टाने हा खटला फेटाळून लावला होता. 2002 मध्ये ही केस पुन्हा उच्च न्यायालयात गेली. 2004 साली सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटांवर ते निवडून आले. 2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू ला दोषी ठरविले आणि तीन वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षेमुळे सिद्धूला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. सिद्धूचे व्यक्तीमहत्व हे वादग्रस्त आहे. तो अनेक कारणांसाठी नेहमी चर्चेत असतो.