Home » संजय राऊतांनी पोलिसांच्या गराड्यातून बाहेर येऊन दाखवावे!
आपलं राजकारण काय चाललंय?

संजय राऊतांनी पोलिसांच्या गराड्यातून बाहेर येऊन दाखवावे!

भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महिला अत्याचारवरुन त्यांनी शिवसेनेला सुनावले आहे. संजय राऊत यांनी हिंमत असेल तर एकदा पोलिसांच्या गराड्यातून बाहेर निघून उभे राहावे, मग भाजपा कार्यकर्ते तुम्हाला इंगा दाखवतील, असे आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

राऊतांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरु मानू नये आणि बोलू देखील नये. असे देखील राणे म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी हिंमत असेल तर आपल्या शब्दावर ठाम राहावे. पोलिसांना बाजूला करावे आणि आपली जीभ कशी वापरायची हे भाजपा कार्यकर्ते त्यांना दाखवतील. राऊत ज्या प्रकारे विधाने करत आहेत, त्यावरून त्यांच्या जिभेवर संशोधन व्हायला हवे. त्यांच्या जिभेला हाड असेल आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बाहेर यावे.