Nagpur: राज्यात आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीये. मात्र, आज अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर नव्हते. याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे (Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री आज अधिवेशनाला आलेले नाहीत यात काही नवीन घडलं अस नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रालयात किती वेळा आले? राज्यावरील संकटात ते कधी बाहेर निघाले? असे अनेक प्रश्न रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारलेत. RSS संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी ते आज नागपुरात होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अनेक टीकेचे बाण सोडले आहेत.
उद्धव ठाकरे हे आजरी असल्याच महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो कि, ते लवकर बरे व्हावे, आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत लवकर रुजू व्हावेत, असही दानवे त्यावेळी म्हणाले.
दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती पाहून भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर भाष्य करत शिवसेनेची (Shivsena) खिल्ली उडवली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुद्धा रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा खोचक टोला लगावला.