Home » हात थरथरत होते; रतन टाटांना रहावले नाही, साधला मोडक्या तोडक्या हिंदीतून संवाद
काय चाललंय?

हात थरथरत होते; रतन टाटांना रहावले नाही, साधला मोडक्या तोडक्या हिंदीतून संवाद

मी हिंदीतून भाषण करू शकणार नाही, त्यामुळे मी इंग्रजीतून बोलेन..हे शब्द आहेत जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे. यावेळी इमोशनल झालेले रतन टाटा पाहायला मिळाले. याचं निमित्त होत आसाममधील कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाचे. आता इथून पुढच्या आयुष्यातील शेवटचे क्षण हे आरोग्य सेवेसाठी देणार असल्याचे उद्गार रतन टाटा यांनी काढताच उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

कार्यक्रमातील उपस्थित लोकांची परवानगी घेत, रतन टाटांनी इंग्रजीत भाषणाला सुरुवात केली. “संदेश एकच असेल, तो सुधा माझ्या हृदयातून असेल असं म्हणत उर्वरित आयुष्य मी आरोग्य सुविधांसाठी वेचले आहे”, असे उद्गार कापऱ्या आवाजत रतन टाटांच्या तोंडून निघाले आणि समोर बसलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले.

हे सगळ बोलत असताना, रतन टाटा त्यांच्या आवाजातून थरथरत होते, त्यांचे हात कपात होते. मंचावर प्रमुख उपस्थितांमध्ये पंतप्रधान मोदीही होते. रतन टाटांना मंचावर बोलण्यासाठी आमंत्रित केल्यावर, निवेदिकेने त्यांचा हात धरून त्यांना माईकजवळ अनल होत.

काही वेळ इंग्रजीत बोलल्यावर रतन टाटांना काही राहवले नाही, आणि ते पुन्हा हिंदीत संवाद साधू लागले. आपल्या तोडक्या मोडक्या हिंदीतून त्यांनी पंतप्रधानाची स्तुती केली. “भारतातील एक लहान राज्य कॅन्सरवरील उपचार केंद्राचे उद्घाटन करू शकते हे आज जगाला सांगू शकतो. आपले मोडी सरकार आसामला विसरले नाही, मी त्यांचा आभारी आहे, आता आसाम पुढे जाईल यात शंका नाही” असं टाटांनी बोलताना म्हटलं.