Home » ‘माझ्यावर कारवाई करू नका’ विनंतीसाठी समीर वानखेडे पोलीस आयुक्तांच्या भेटीला !
काय चाललंय?

‘माझ्यावर कारवाई करू नका’ विनंतीसाठी समीर वानखेडे पोलीस आयुक्तांच्या भेटीला !

प्रभाकर साईल यांनी चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासे केले.
समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप.
वानखेडे यांनी लिहिलं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र.

NCB चे संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप ! ड्रग्स प्रकरणातील फरार साक्षीदार के. पी  गोसावींचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल याने चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे, आता प्रकरणाला वेगळे वळण लागल्याने समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून विनंती केली.

‘हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे. पण काही लोकांकडून मला धमक्या देण्यात आल्या कि तुला आम्ही ड्रुग्स प्रकरणात अडकवू, नोकरी वरून काढून टाकुत’ म्हणून आपणास माझी विनंती आहे कि, आपण माझ्यावर कोणतीही कारवाई करू नये. असे समीर वानखेडे यांनी पत्रात लिहून विनंती केली. 

प्रभाकर साईल चे वानखेडेवर कोणते आरोप?

पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून माझी सही कोऱ्या कागदावर घेतली, नऊ ते दहा कागदावर माझ्या सह्या घेतल्या. ड्रग्स प्रकरणात पैशाची डील हि झाली आहे. असा आरोप के.सी गोसावी यांचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल यांनी केला आहे 

दरम्यान, प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी मी योग्य वेळेवर उत्तर देईल असं देखील म्हटलं आहे.