भारतात जातीयवाद मोठ्या प्रमाणात आहे. जातीयवादाची अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत असतो, जातीय दंगली देखील नवीन नाहीत. पण आता जातीवाद शाळेपर्यत येऊन पोहचला आहे. आता हेच पहा उत्तराखंड मधील एका शाळेमध्ये उच्चवर्णीय मुलांनी शालेय पोषण आहार खाण्यास नकार दिला. त्यावर बहिष्कार टाकला. कारण शालेय पोषण आहार बनविणाऱ्या ज्या मावशी म्हणजे भोजनमाता (Uttarakhand Dalit Cook) आहेत त्या दलित आहेत म्हणून विद्यार्थीनी जेवणास नकार दिला.
सुनीता देवी या महिलेस चंपावत जिल्ह्यातील एका महाविद्यालयात 6 वी ते 8 वीच्यासाठी माध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी नियुक्त केले. पण दुसऱ्या दिवशीच विद्यार्थ्यांनी सुनीता देवी यांच्या हातचे भोजन करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना त्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले (Uttarakhand Dalit Woman).
सुनीता देवी म्हणतात, आठवडाभर शाळेत काम केले. 21 डिसेंबरला तीन दिवस सुट्टी घेतली होती, पण त्या नंतर तिला पुन्हा शाळेत येऊ दिले नाही. 14 डिसेंबरला 25-30 पालक शाळेत आले. शिक्षक आणि स्वयंपाक घरातील कामगारांवर आरडारोडा करू लागले. पालकांचं म्हणनं होतं त्यांच्या मुलांना खालच्या जातीतील महिलांनी बनविलेले अन्न खाण्यास भाग पाडले.
शाळेतील शिक्षकांनी या सगळ्यांचा विरोध केला. ते देखील उच्चवर्णीय (Upper Caste) असले तरी पीटीएच्या सदस्यांनी मला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. सुनीता देवी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणतात मला फार भीती वाटते. कारण गावकऱ्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले आहे.
जेव्हा-जेव्हा आम्ही तिथून जातो. ते माझ्या कुटुंबाविरुद्ध टीका करतात. माझी दोन्ही मुलं एकाच शाळेत शिकतात. माझा नवरा मजूर आहे. आमच्याकडे कमाईचे कोणतेच साधन नाही. पण आता हे प्रकरण फक्त उत्तराखंडमध्येच गाजलं नाही तर संपूर्ण देशांत या प्रकरणावर जोरदार टीका करण्यात आली.
मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. याविषयी सरकारी अधिकारी स्पष्टीकरण देताना म्हणतात, की सुनीता देवी यांना त्यांच्या जातीमुळे काढून टाकण्यात आले नाही, तर त्या या पदासाठी पात्र नव्हत्या. त्यांची नियुक्ती नियमानुसार झाली नव्हती. त्यामुळे त्यांना काढून टाकले.
ह्या प्रकरणाचा तपास आणखी सुरू आहे. सुनीता देवी (Sunita Devi) यांना पुन्हा कामावर ठेवले जाऊ शकते. हे प्रकरण मात्र संपण्याचे नाव घेत नाही. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. आता दलित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी (Uttarakhand Dalit Students) उच्च प्रवर्गातील महिलेने बनविलेले जेवण घेण्यास नकार दिला आहे.
जेवणार बहिष्कार टाकला आहे (Mid Day Meal). जर ते विद्यार्थी दलित महिलेने बनविलेले अन्न खाणार नसतील तर आम्ही देखील उच्चवर्गीय महिलेने बनविलेले अन्न खाणार नाही, असे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.