वसीम रिझवी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष यांनी आज हिंदु धर्म स्वीकारला. गाझियाबाद येथील डासना मधील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. इस्लाम धर्म सूडून हिंदू धर्मात त्यांचे नाव “ हरबीर नारायण सिंह“ असे ठेवण्यात आले. नरसिंहानंद सरस्वती जुना आखाडाचे महामंडलेश्वर यांनी वसीम रिझवी यांना सनातन हा धर्म मिळवून दिला. ‘आम्ही वसीम रिझवी यांच्या सोबत आहोत’ असे त्यांचं म्हणन आहे.
इस्लाम धर्म त्यागल्या नंतर रिझवी म्हणाले, “मला आमच्याच लोकांनी इस्लाममधून बहिष्कृत केल. हिंदू धर्म स्वीकारल्या नंतर मी सनातन हा धर्म स्वीकारला. हा धर्म स्वीकारण्याचा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. माझ्या मते सनातन या धर्मात चांगुलपणा आणि मानवता आढळते. त्याबरोबरच मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्म वाचून निर्माण केलेल्या ह्या धर्माचा दहशतवादी चेहरा बघितल्यानंतर हा धर्म नाही हे मला समजले.
ते पुढे बोलताना म्हणाले कि , “इस्लाम हा एक दहशतवादी गट आहे जो १४०० वर्षापूर्वी अरबस्तान मध्ये तयार झाला होता. जुम्मा या प्रार्थनेनंतर आम्हाला मुंडके कापन्यास सांगितले जाते. मला मुस्लीम म्हणून राहण्यास लाज वाटते, म्हणून मी इस्लाम धर्माचा त्याग करत आहे”. वसीम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्या नंतर त्यांचे शुद्धीकरण करण्यात आले. त्या बरोबरच हवन–यज्ञही नरसिंहानंद सरस्वती यांच्या देख्ररेखी खाली चालू आहे .