Home » कोण आहे हा भारताचा PUBG स्टार? PUBG खेळून महिन्याला कमावतोय करोडो रुपये!
काय चाललंय? खास तुमच्यासाठी! खेळ-कुद

कोण आहे हा भारताचा PUBG स्टार? PUBG खेळून महिन्याला कमावतोय करोडो रुपये!

भारताचा नं १ PUBG प्लेअर..

ऑनलाइन गेमिंगच तरुणाईला असणार फॅड आता सर्वपरिचित झालेल आहे. अवघ्या तरुणाईच विश्व व्यापणारे हे गेम क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे आहेत. आकर्षक मांडणी आणि फायटिंग शायटींगमुळे लहान मुलांना देखील हे गेम आवडतात. अत्याधुनिक शस्त्र, स्नायपर तसच शत्रुला कोंडीत पकडून मारण्याच कसब यामुळे गेमर यात गुंगून जातात. तासनतास PUBG खेळणारे काही गेमर आहेत.

बरेचदा उत्कृष्ट टाईमपास म्हणून हा गेम खेळतात. परंतु एका युवकाने मात्र PUBG खेळून करोडो रुपये कमावले आहेत. PUBG ला निव्वळ टाईमपास समजणाऱ्यांच्या भुवया निश्चितच उंचावल्या असतील.

कोण आहे हा PUBG स्टार?

नमन माथुर/Soul Mortal

नमन माथुर हा २३ वर्षीय युवक PUBG गेमचा भारतीय बेस्ट प्लेअर आहे. मुंबईत राहणाऱ्या या युवकाने कॉमर्सची डिग्री घेतलेली आहे. ऑनलाईन गेमिंगमध्ये तो मॉर्टल या नावाने प्रसिद्ध आहे. लहानपणापासून त्याला व्हिडिओ गेमिंगची आवड होती. सुरुवातीला तो GTA, MARIO इ. गेम खेळायचा. नंतर त्याने PUBG खेळण्यास सुरुवात केली आणि त्यात निपुणता मिळवली.

PUBG तर्फे घेण्यात आलेल्या अनेक टूर्नामेंट त्याने जिंकलेल्या आहेत. जवळजवळ २०००० डॉलरची रक्कम तो यात जिंकलेला आहे. PUBG ला विरोध करणारे थक्क झाले असतील. नमन स्वताचे गेमिंग YouTube चॅनेल चालवतो. दररोज तो यावर स्वताची गेमिंग स्ट्रीम करतो. YouTube वरही त्याचे लाखो सब्सस्क्रायबर आहेत. आवडीचा काम म्हणजेच खेळ आणि त्यातून पैसा अशी किमया नमन माथुरने कमी वयातच साधली आहे.