Home » अभिमानास्पद ,जय भीम ऑस्करच्या यूट्यूबवर दिसणार
Celebrities Entertainment Movies Uncategorized

अभिमानास्पद ,जय भीम ऑस्करच्या यूट्यूबवर दिसणार


जय भीम या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावाने केले आहेत. आज या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड केला आहे.जय भीम हा दाक्षिणात्य सिनेमा आता ऑस्करच्या युट्यूब चॅनलवर दिसणार आहे.

हा मान मिळवणारा जय भीम हा पहिला सिनेमा ठरला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी IMDBने 2021 मधील लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहीर केली या यादीमध्ये जयभीमने पहिले स्थान प्राप्त केले आहे.

अन्यायग्रस्त कुटुंब आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा वकील अशी संघर्ष दाखविणारा हा चित्रपट आहे. मागच्या वर्षी लाखों चाहत्यांना हा सिनेमा प्रचंड आवडला. जय भीम चित्रपट 4 नोव्हेंबर 2021 ला सिनेमा अमेझोन प्राइम विडियोवर प्रदर्शित झाला.

या सिनेमाचे बजेट 10 कोटीहून अधिक होते. साऊथचा सुपरस्टार सूर्या याने न्यायमूर्ती चंद्रूची भूमिका साकारली होती. खर्चाहून अधिक कमाई या सिनेमाने केली होती.