Home » झुंड वर टीकेचे बाण “इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?
Uncategorized

झुंड वर टीकेचे बाण “इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?


झुंड हा चित्रपट 4 मार्चला रिलीज झाला, चित्रपटाला संपूर्ण देशांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी सिनेमावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. अनेकांनी या सिनेमाचे तोंड भरून कौतुक केले आहे. चित्रपटांतील गाणी, अमिताभ यांचा अभिनय आणि सिनेमाची एकूण टीम यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिस वर भरपूर गल्ला जमा करत आहे.

आमीर खान, धनुष यांनी देखील सिनेमाचे तोंड भरून कौतुक केले आहे. सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला पाहिजे असं म्हटलं जात आहे. अनेक मोठ्या कलाकारांनी नागराज सोबत काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पण या बरोबरच या सिनेमावर आता टीका देखील होऊ लागली आहे.

“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? असा सवाल लेखिका शेफाली वैद्य यांनी केला आहे. शेफाली वैद्य या सोशल मिडियावरील एक प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांना फॉलो करणारे अनेकजण आहेत. मात्र यावेळी शेफाली यांचे मत अनेकांना पटलेले नाही.

चित्रपटात कोणाला घ्यायचे हा दिग्दर्शकांचा प्रश्न आहे. त्यांना ते ठरवू द्या असे नेटकऱ्याने म्हटलं आहे. यावर शेफाली यांनी देखील जोरदार उत्तर दिले आहे. कुणी काय करायचं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, तुम्हाला हवं तितक्यादा हा सिनेमा बघा असं त्या म्हणाल्या आहेत.