नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित झुंड हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटांचे सेलेब्रिटी यांच्यासाठी स्पेशल स्क्रीनिंग देखील ठेवण्यात आले होते. हा चित्रपट पाहिल्या नंतर अनेकांनी या चित्रपटाविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमीर खानने देखील अगदी तोंड भरून कौतुक केले आहे.
आमीर म्हणाला आम्हाला 20 -30 वर्षात जे जमलं नाही ते नागराजने करून दाखवलं. धनुषने देखील झुंडचे तोंड भरून कौतुक केले आहे. हा चित्रपट पाहून मी निशब्द झालो आहे. अशा शब्दांत धनुषने या चित्रपटांचे कौतुक केले आहे. चाहते आता म्हणतात की नागराज आणि धनुष डेडली कॉम्बिनेशन होऊ शकतं. कुठून सुरुवात करू हे समजत नाही. अप्रतिम चित्रपट आहे. नागराजमुळे यांचा आवाज चित्रपटांमर्फत प्रेक्षकांपर्यत पोहचला आहे,
दुर्लक्ष करता येणार नाही, असं त्याचं काम आहे. मी या चित्रपटांतील तांत्रिक बाबी बद्दल हजार शब्द बोलू शकतो पण या चित्रपटाची भावना तुमचे मन जिंकून घेते. हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असा आहे. हा चित्रपट म्हणजे उत्कृष्ट नमूना आहे. मी निशब्द झालो आहे. अमिताभ यांच्या अभिनयाचे कौतुक करावे तितके कमी आहे.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांनी क्रीडा प्रशिक्षकांची भूमिका साकारली आहे. झोपडपट्टी राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्याचं आयुष्य कसं बदलून जातं. असे या चित्रपटांचे कथानक आहे. या चित्रपटांची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे, नागराज मंजुळे यांनी तब्बल दोन वर्ष यांची स्क्रिप्ट लिहिली आहे. नागराज यांनाच समोर ठेवून हा चित्रपट लिहिला गेला आहे.
विजय बारसेवर आधारित झुंड सिनेमा फुटबॉलवर आहे. विजय यांनी अनेकांचे आयुष्य बदलले आहे. या चित्रपटांत नागराज मंजुळे, अमिताभ बच्चन यांच्यासह रीकु राजगुरू, आकाश ठोसर यांच्यासह अनेक अभिनेत यामध्ये आहेत.