नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शना नंतर फार चर्चेत आहे. या चित्रपटांचे अनेक कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, समीक्षकांनी कौतुक केले आहे. मात्र नागराज मंजुळे मात्र काही कारणास्तव ट्रोल झाले आहेत. नागराज यांनी ट्रोलर्सला मात्र जोरदार उत्तर दिलं आहे. नागराज यांनी एबीपी माझाला नुकतीच एक मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
मंजुळे यांनी या टॉक शो दरम्यान चित्रपटांचे अनेक किस्से शेअर केले आहेत. नागराज यांच्यावर जातीवरुन टीका केली जात आहे. त्या बाबत काय वाटते असे विचारले गेले यावर नागराज म्हणाला मी कोणतीही जात मानत नाही, मलाही कोणत्याही जातीच्या बेडीत अडकवू नका असे आवाहन केले आहे.
नागराज पुढे म्हणाला माझ्या जवळ सर्व जातीची माणसे आहेत,मी स्वताला कोणत्याही जातीचा मानत नाही. त्यामुळे मला कोणीही कोणत्या जातीचा मानू नये. सोशल मिडियावरच्या कमेंटस मी वाचत नाही.
माझ्या घरात देखील सर्व जातीचे लोक राहतात. मी जातीयवादी आहे, असं मला कोणी म्हटलं तर मी ते गांभीर्याने घेत नाही. माझ्यात काही विकार असतील तर ते मला सांगा मी ते सुधारेन, माझ्यातील चुका देखील सुधारण्याचा प्रयत्न करेल पण जातीवर टीका करणे चुकीचे आहे.
मला काही सांगायचं असेल तर समोर येऊन सांगा फेसबुकवर नको. लोक घरी बसून काहीही लिहितात पण मी कोणत्या जातीच्या विरोधात नाही.मी माझ्या जातीच्या विरोधात आहे. जे जात धर्म पाळतात त्यांच्या विरोधात मी आहे, असं देखील नागराज म्हणाला.