Home » विजय चौकात फाशी द्या ,अस का म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
Uncategorized

विजय चौकात फाशी द्या ,अस का म्हणाल्या सुप्रिया सुळे ?


खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. सुप्रिया सुळे म्हणतात की सर्व माहिती लिक होत आहे. जर पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकलं जातं.

आमच्या कडून जर चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक असेल तर खटला चालवा. पण ईडी आणि सीबीआयचा गैरवापर नको. आम्ही देखील सत्ताधारी बाकावर बसलो होतो, आमच्याकडून देखील पीएमएलची चूक झाली आहे पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा. मोदी सरकार ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करत आहे.

या संस्था स्वातंत्र्य आहेत का? मग धाड पडणार असेल तर 4-5 दिवस आधी ट्विटरवर कसं काय समजतं. या बाबत मी तारखे नुसार पुरावे सादर करते. एखादा नेता 15 दिवसात तुरुंगात जाणार हे कसं काय माहीत असतं. तुमचे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार आहे के कसं काय माहीत असतं.

ट्विटरवर असलेले या बाबतचे पुरावे मी तारखेनुसार सादर करते. यांचे दोनच अर्थ निघतात एकतर तुम्ही हे मान्य करा की ईडी आणि सीबीआय या सर्व संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात, खरं बोला अमित शहा खरं बोलतात, मला वाटतं मी फक्त त्यांनाच याबाबत विचारते, सरकारमध्ये इतर कोण खरं बोलतं याबाबत माहीत नाही. अमित शहा तर नक्कीच खरं बोलतात.