कहो ना प्यार है हा सिनेमा हिंदीमधील एक माइल स्टोन सिनेमा समजला जातो. ऋतिक रोशनचा हा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा. आज देखील या सिनेमातील अनेक गाणी लोकांच्या तोंडी जशाच्या तशी पाठ आहेत. अनेकजण सहज म्हणतात की ऋतिकला तर त्यांच्या वाडिलांनीच लॉंच केले, त्यामुळे त्यांचा सिनेमा हिट गेला पण हे समीकरण इतकं सोप्पं नव्हतं.
एकवेळी इतर दिग्दर्शका सोबत काम करणं सोप्पं पण स्वताच्या वडिलांसोबत काम करणं जास्तच अवघड, काही बोलता देखील येत नाही.त्यात राकेश रोशन म्हणजे बॉलीवुडमधील उत्तम दिग्दर्शक, कामावर प्रचंड प्रेम करणारे , त्यामुळे ऋतिकला सर्व अवघड गेले. अगदी कडक शिस्तीत सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं.
सगळीकडे नुसती चित्रपटांची चर्चा सुरू होती. टायटल सॉन्ग फुल व्हायरलं झालं होतं. ऋतिक सोबत त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल देखील गाजत होती. एकूणच काय चित्रपट सुपरहीट जाणार हे फिक्स होतं. राकेश रोशन, ऋतिक रोशन आणि व्हीडीओ एडिटर असे तिघे बसून चित्रपटांचे सीन लावून एडीटिंग करत होते.
ऋतिकला जो सीन बेस्ट वाटायचा तो शॉट राकेश मात्र त्या विडियो एडिटरला उडवायला लावायचे. ऋतिक खूप वाईट वाटायचे पण बोलणार काय? तो तसाच घरी यायचा आणि राकेश रोशन झोपले हे पाहिले की हळूच रिक्षा करून पुन्हा एडिटिंग रूमला परत जायचा. त्या विडियो एडिटिरला हाताला धरून स्वताला जे सीन आवडले आहेत, ते सीन पुन्हा अॅड करायचा.
विडियो एडिटिरला देखील विचारायचा हा सीन कसा वाटतो. राकेश रोशन यांच्या हे लक्षात आले. पण काहीच बोलले नाहीत. पुढे सिनेमा रिलीज झाला आणि काय झालं ते सर्वांनाच माहीत आहे. चित्रपट सुपर हिट झाला.