Home » चांगलं सुरू असलेलं दुकान बंद करून किरण माने अभिनयाकडे वळाले होते
Uncategorized खास किस्से खास तुमच्यासाठी! मायानगरी

चांगलं सुरू असलेलं दुकान बंद करून किरण माने अभिनयाकडे वळाले होते


कलाकार आणि चर्चा हे एक वेगळं समीकरण आहे. कलाकार नेहमी चर्चेत असतात, ते त्यांच्या भूमिकेमुळे, त्यांच्या कपड्यामुळे किंवा त्यांच्या भूमिकेमुळे आता तुम्ही विचार कराल कसली भूमिका, तर ही भूमिका म्हणजे एखादी घटना घडते आणि ते त्यावर ते त्यांचे मर नोंदवितात. त्यांनी त्यांचे मत प्रदर्शन केल्यानंतर काहीना त्यांचे मत पटते तर काहींना पटत नाही.

प्रेक्षक टीका करतात, काही राजकीय पक्ष धमकी देखील देतात असचं काही मुलगी झाली हो मधील किरण माने या अभिनेत्यासोबत झालं. किरण माने सोशल मिडियावर प्रचंड अॅक्टीव असतात.ते नेहमी अनेक पोस्ट शेअर करत असतात. त्याबद्दल त्यांना अनेक धमक्या देखील येतात पण किरण माने काही थांबत नाहीत.

काल मात्र किरण माने सध्या जी मालिका करत आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून त्यांना चक्क काढून टाकण्यात आलं. किरण माने यांनी या विषयी त्यांच्या सोशल माध्यमांवर पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे.

तुम्ही सोशल मिडियावर लिखाण करता हे कारण पुढे करत त्यानं मालिकेतून काढून टाकले. पण किरण माने यांचा आता पर्यतचा प्रवास इतका सोप्पा नव्हता. त्यांना मालिका आणि चित्रपट यामध्ये काम करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे.

किरण माने हे मूळचे साताऱ्याचे आहेत. त्यांना अगदी लहानपणी पासून अभिनयाची आवड होती. त्यांनी भारत विद्या मंदिर आणि सातारा पॉलीटेक्निक येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी व्यवसायिक रंग भूमीवर देखील काम केले आहे. परफेक्ट मिस मॅच, ती गेली तेव्हा, श्री तशी सौ मनोमिलन अशा व्यवसायिक नाटकांत काम केले आहे. या सोबतच माझ्या नवऱ्याची बायको, पिंपळ पान यासारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

पण त्यांच्यावर एकदा अशी वेळ आली होती जेव्हा त्यांना मालिका, नाटक सोडून पुन्हा साताऱ्यात येऊन गुपचुप एक दुकान टाकावे लागले होते. वाडेफाटा येथे किरण ऑटोमोटीव्ह असे दुकान सुरू केले होते.

वाडेफाटा येथे किरण ऑटोमोटीव्ह असे दुकान सुरू केले होते. दुकान उत्तम सुरू होतं पण किरण यांना राहून राहून अभिनयाची आठवण यायची. किरण यांच्या मनात रंगभूमीविषयी एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. एक दिवस किरण दुकान साफ करत होते. त्यावेळी किरण यांना एक रद्दी पेपर मिळाला.

त्यामध्ये पुण्यातील एका नाटकांच्या कार्यशाळेची जाहिरात होती, किरण यांनी ही जाहिरात पाहिली आणि पुन्हा एकदा त्यांच्या मनात अभिनयाचे वादळ सुरू झाले. किरण यांनी पुन्हा अभिनय करण्याचे ठरविले.

त्यांनी दुकानाला टाळे ठोकले आणि पुण्याकडे रवाना झाले. पुण्यात येऊन त्यांनी ती कार्यशाळा केली आणि त्यांच्या अभिनयाच्या करियरला पुन्हा सुरुवात केली. किरण हे आधीपासूनच रोखठोक आणि स्पष्ट बोलतात त्यामुळे त्यांना त्यांचा त्रास देखील होतो पण किरण यांनी आता ठरविले आहे माघार घ्यायची नाही.