भारताच्या गाणं कोकिळा लता मंगेकशकर आणि हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खास मैत्री होती. बाळासाहेबांनी लता दीदी यांना भगिनीचा दर्जा दिला होता. लता दीदी आणि बाळासाहेब यांच्यामुळे मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबाचा मोठा घरोबा होता.
बाळासाहेब जेव्हा कलानगर परिसरात राहत तेव्हा हदयनाथ, लतादीदी, आशाताई, उषाताई,मीना ताई असे मंगेशकर बंधु भगिनी त्यांच्या बंगल्यावर जात. तेथे त्यांच्या गप्पा आणि विचारांची देवाण-घेवाण होत. मंगेशकर कुटुंबाची कोणतीही गोष्ट असू, बाळासाहेब आवर्जून कौतुक करत. मंगेशकर बंधु – भगिनी यांनी बाळासाहेब यांना एकत्रित असलेल्या श्रीराम- लक्ष्मण – सीता व हनुमान यांची सुंदर रेखीव मूर्ती भेट दिली होती. त्यांनी ती प्रेमाने स्वीकारली होती. तेव्हा देखील कौतुकाने सांगितले होते, भेट आवडली बरं का. कौतुक आणि ओरडा देखील कधी कधी मंगेशकर भावडांना खावा लागत.
बऱ्याचदा नातेसंबंध प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एकमेकांना आतून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असते. सुरुवातीच्या काही भेटींनंतर ज्यावेळेस कौटुंबिक सलोख्याचे नाते निर्माण झाले. त्यावेळेस एकदा बाळासाहेबांनी लतादीदी यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली.त्यावर लता दीदी म्हणाल्या की राजकारण हा आमचा प्रांत नाही. आपण राजकारणात फार चांगले आहात. उत्तम काम करत आहात. माझ्या शुभेच्छा त्यानंतर मात्र बाळासाहेब यांनी लता दीदी यांच्यासमोर कधीच राजकारणाचा विषय काढला नाही.
लता दीदी यांनी शिवसेनेच्या अनेक मेळाव्याना उपस्थित राहत. एकदा एका सभेत लता दीदी यांना गाणे गाण्यांची विनंती केली. लता दीदी यांनी सुरेख गाणी गायली,. त्यावेळेस बाळासाहेब देखील मंचावर उपस्थित होते. त्यांनी लता दीदी यांचे तोंड भरून कौतुक केले होते. बाळासाहेब ठाकरे यांना लतादीदी यांची अनेक गाणी आवडत असे, तेव्हा बाळासाहेब अनेकदा राज यांना लता दीदी यांच्या घरी पाठवत आणि त्यांच्या गाण्यांच्या सीडी मागवून घेत.
एकदा लता दीदी कामानिमित्त कोल्हापूरला गेल्या होत्या,तेव्हा त्यांना समजले की बाळासाहेब यांची तब्येत ठीक नाही.त्यांनी बाळासाहेब यांना फोन केला आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की तुम्ही मासळी वैगेरे खात नाहीत का? तेव्हा लता दीदी म्हणाल्या मला जास्त तिखट लागत नाही. बाळासाहेब यांनी लता दीदी जेव्हा पुन्हा मुंबईत आल्या तेव्हा बाळासाहेब यांनी लता दीदी यांना आवर्जून जेवायला बोलविले होते.