प्रसिद्ध गायिका, भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 वर्षी दुखद निधन झाले. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.यामध्ये सर्वात उच्च पुरस्कार म्हणजे भारतरत्न होय. लता मंगेशकर यांनी भारतीय भाषांतील 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहे.
लता मंगेशकर यांना महागड्या गाड्या आणि सुंदर साड्यांचा छंद होता. लता मंगेशकर यांना जेवणात मासे खायला आवडत असे. लता मंगेशकर वयाच्या 15 वर्षांपासून गाणी गात आहेत. वडिलांच्या निधनानंतर लता यांच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आली.
लता मंगेशकर यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. लता यांचे काल मुंबईत निधन झाले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचा लहान भाऊ हदयनाथ मंगेशकर यांनी मुख अग्नि दिला. लता मंगेशकर यांच्या मागे त्या तब्बल 368 कोटी रुपयांची संपत्ती सोडून गेल्या आहेत.
लता मंगेशकर यांना ही सर्व संपत्ति त्यांच्या गाण्याच्या रॉयलीटीमधून मिळालेली आहे. लता मंगेशकर उत्तम गुंतवणूक करत असत. लता मंगेशकर यांची पहिली कमाई ही केवळ 25 रुपये इतकी होती.लता मंगेशकर महिन्यायाकाठी 40 लाखरुपये कमावत. वर्षाकाठी तब्बल 6 कोटी रुपये. लता मंगेशकर यांचा दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर एक बंगला आहे. त्यांचे नाव प्रभूकुंज हे आहे. त्या येथेच राहत असे.
लता मंगेशकर यांच्या या बंगल्याची एकूण किंमत करोंडो रुपये इतकी आहे. लता मंगेशकर यांच्याकडे शेवरेल ब्युक आणि क्रिसलर या गाड्या होत्या. यश चोपडा यांनी त्यांना मर्सिडीज ही गाडी भेट दिली होती.