भय्यू महाराज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील प्रसिद्ध महाराज असा त्यांचा नाव लौकिक होता. अनेक नेत्यांना त्यांना भेटण्याची आतूरता असत. ते नेहमी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी चर्चेत असतं, भय्यू महाराज यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख हे होते. 1968 मध्ये त्यांचा जन्म शूजालपुर येथे झाला. त्यांचे वडील जमीनदार होते. भय्यू महाराज यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि त्या नंतर त्यांनी एका मोठ्या कंपनीमध्ये अनेक दिवस नोकरी देखील केली. त्यांना मॉडेलिंग करण्याची फार आवड होती पण त्यांना ते जमले नाही.
2011 साली भय्यू महाराज खऱ्या अर्थाने रातोरात सुपरस्टार झाले. ऑगस्ट 2011 मध्ये कॉंग्रेस सरकार होते तेव्हा अण्णा हजारे यांनी एक आंदोलन केले होते. हे आंदोलन अनेक दिवस चालले होते, तेव्हा भय्यू महाराज यांनी कॉंग्रेस आणि अण्णा हजारे यांच्या मध्ये मध्यस्थी करून ते आंदोलन थांबविले होते. तसेच प्रतिभा पाटील या राष्ट्रपती होतील अशी भविष्यवाणी देखील त्यांनी केली होती. यामुळे भय्यू महाराज रातोरात सुपरस्टार झाले होते. आधी त्यांना वाटले होते की त्यांनी मॉडलिंग करावे पण नंतर ते सामाजिक कार्याकडे वळाले. त्यांनी महाराष्ट्राची संत परंपरा स्वीकारली.
त्यांनी सामाजिक कार्य करणारे अनेक प्रकल्प सुरू केले. भय्यू महाराज जरी सामाजिक कार्यकर्ते असले तरी राजकारणात देखील त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी दोनदा नरेंद्र मोदी स्वता आले होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे भय्यू महाराज यांच्याशी चांगले संबंध होते. मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधिला देखील त्यांना बोलविण्यात आले होते.
12 जून रोजी एक बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला भय्यू महाराज यांनी इंदौर येथील त्यांच्या घरात गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्याआधीचे त्यांचे निधन झाले होते. परंतु भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली ही गोष्ट त्यांच्या पत्नीने व मुलीने मान्य केली नाही. त्यांचे चाहते आणि त्यांना मानणाऱ्या लोकांनी देखील ही गोष्ट मान्य केली नाही. भय्यू महाराज यांनी ज्यावेळी गोळ्या झाडून घेतल्या त्यावेळी त्यांच्या रूममध्ये सुसाईड नोट सापडली, यामध्ये त्यांनी त्यांच्या संपत्तीचा पुढील वारस त्यांचा शिष्य विनायक असे लिहिले होते.
तसेच मानसिक चिंतेतून त्यांनी आत्महत्या केली आहे, असे देखील त्यांनी लिहिले होते. पोलिसांनी या घटनेचा तब्बल सहा महीने तपास केला, त्या नंतर भय्यू महाराज यांचे शिष्य विनायक दुधाडे, शरद देशमुख आणि पलक अशा तिघांना अटक केले. पलक नामक मुलगी भय्यू महाराज यांना अनेक दिवस ब्लॅकमेल करीत होती. तीच्या सोबतचे काही चॅट आणि अन्य काही गोष्टी समोर आल्या आहेत. ही युवती भय्यू महाराज यांना लग्न करू म्हणून मागे लागली होती. त्यासाठी ती त्यांच्यावर दबाव टाकत होती. विशेष म्हणजे भय्यू महाराज यांनी दोन लग्न केली होती.
त्यांची पहिली पत्नी 2015 मध्ये एका आजारांमुळे मृत्युमुखी पडली होती. त्यांना पहिल्या पत्नी पासून कुहू नामक एक मुलगी आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधना नंतर त्यांनी 2017 मध्ये मध्यप्रदेशांतील डॉक्टर आयूषी यांच्याशी लग्न केले होते. जेव्हा भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांची मुलगी कुहू हिने डॉक्टर आयूषी यांच्या आरोप केला होता की त्याच्यामुळे भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली आहे. भय्यू महाराज यांनी आत्महत्या करताना एका सुसाईट नोटमध्ये त्यांनी त्यांचा सर्वात जवळचा सेवेकरी विनायक यांच्या नावावर सर्व संपत्ती केली होती. तसेच त्यांच्या आश्रमाचे सर्व अधिकार देखील विनायकला दिले होते. परंतु पोलिसांनी अवघ्या सहा महिन्यांत संपूर्ण प्रकरण समोर आणले, यामध्ये हे समोर आले की विनायक, पलक आणि अन्य तीन लोकांनी एकत्र येऊन भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. काल कोर्टाने त्यांना आरोपी घोषित करून. कारावासाची शिक्षा दिली आहे.