साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या श्रीवल्ली आणि त्या बरोबरच पुष्पा सिनेमातील तीच्या एकूण अभिनयामुळे प्रचंड चर्चेत आहे. तीच्या श्रीवल्ली गाण्याने तर अनेकांना वेड लावले आहे. त्यामुळे रश्मिका सध्या प्रचंड चर्चेत आहेत. सोशल माध्यमांवर देखील तीचे चाहते रोज वाढतच आहेत.
सध्या रश्मिका हिच्या लग्नाची सोशल मिडियावर चर्चा आहे. लवकरच ती लग्न बंधनात अडकणार आहे अशा चर्चा यांना उधाण आले आहे. रश्मिका सध्या साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा याला डेट करत आहे, लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत अशा चर्चा आहेत. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का रश्मिका हिचा यापूर्वी देखील एकदा साखरपुडा झाला होता आणि तो मोडला होता.
2017 मध्ये रश्मिका हिचा साखरपुडा अभिनेता रक्षित शेट्टी यांच्या सोबत झाला होता. त्यांचे नाते तब्बल 14 महीने टिकले पण त्यानंतर मात्र त्यांचा साखरपुडा मात्र मोडला. रश्मिका आणि रक्षित यांची एका शूटिंग दरम्यान ओळख झाली होती.
जेव्हा त्यांचा साखरपुडा मोडला तेव्हा रश्मिका हिच्यावर खूप टीका झाली होती पण रश्मिकाने मात्र त्यावेळी एक पोस्ट करून सारे काही स्पष्ट केले होते, प्रत्येक नात्याच्या दोन बाज असतात आणि आपल्याला त्या दोन्ही बाजू माहीत नसतात. कोणावर टीका करणे चुकीचे आहे. रश्मिका तिचा साखरपुडा मोडल्यानंतर बराच काळ डीप्रेशनमध्ये देखील होती.