Home » थेरगाव क्वीनचे थेर परत सुरू, सुटकेनंतर जंगी स्वागत, विडियो झाला व्हायरलं
Uncategorized

थेरगाव क्वीनचे थेर परत सुरू, सुटकेनंतर जंगी स्वागत, विडियो झाला व्हायरलं


मागील अनेक दिवसांपासून पुण्यात एक प्रकरण बरचं गाजत होतं, ते प्रकरण म्हणजे थेरगाव क्वीन होय. ही 18 वर्षांची मुलगी स्वताला थेरगाव क्वीन म्हणून घेते. ती आणि तीचे काही मित्र मिळून सोशल मिडियावर शिव्या देतात. त्यांचे विडियो बनवून व्हायरलं करतात. मागील अनेक दिवसांपासून ह्या मुलीचे विडियो व्हायरलं होत होते. अनेकांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेरी तिला पिंपरी पोलिसांनी अटक केले.

त्यानंतर तिला समज देऊन सोडण्यात आले. तिला जेव्हा चौकशी दरम्यान विचारण्यात आले की तू असे शिव्या देणारे विडियो का बनविते. तेव्हा तिने हे सर्व प्रसिद्धसाठी करत असलेले सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला दम दिला आणि सोडून दिले, त्या नंतर तिने पोलिसांची रीतसर माफी देखील मागितली. पण बाहेर आल्याबरोबर तीचे पहिले पाढे पंचावन्न सुरू झाले. तिने पोलिसांना सांगितले होते की असे विडियो पुन्हा करणार पण तिने बाहेर आल्यानंतर मात्र सर्वकाही उलटे केले.

ती बाहेर येताच तिच्या मित्रांनी एकच जल्लोष केला आणि तिला खांद्यावर उचलून एकच जल्लोष केला. त्यामुळे थेरगाव क्वीन यातून काहीच शिकली नाही का? असा सवाल देखील विचारला जात आहे. तिच्यासोबत अनेक विडियोमध्ये झळकणार तिचा मित्र कुणाल कांबळे याला देखील पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केले तेव्हा त्याने पोलिसांन समोर गयावया केले. मी या पुढे अशा प्रकारचे विडियो बनविणार नाही हे त्याने स्पष्ट केले. त्यांचा माफीचा विडियो देखील समोर आला होता. पण आता पुन्हा यांचे तेच चालू झाले का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.