Home » ज्या गोऱ्यांनी आपल्यावर राज्य केलं , त्यांनाच या चार भावांनी घरी नोकर म्हणून ठेवलं आहे..
Articles Uncategorized खास किस्से झाल कि व्हायरल!

ज्या गोऱ्यांनी आपल्यावर राज्य केलं , त्यांनाच या चार भावांनी घरी नोकर म्हणून ठेवलं आहे..


परदेशात जाऊन तिथेच स्थायिक होणे हे आता आपल्या भारतीयांसाठी नवीन नाही. पण परदेशांत जाऊन, तिथे मेहनत करून, जेव्हा तो देश त्यांच्या देशांतील श्रीमंत लोकांची यादी जाहीर करतो,तेव्हा त्यामध्ये पहिल्या पाचात स्थान मिळवणारे फार कमी, त्यातीलच एक आहेत आपले भारतीय हिंदुजा बंधु. लंडनमध्ये एक भारतीय कुटुंब नेहमी चर्चेत असतं हे कुटुंब म्हणजे हिंदुजा होय. लंडनच्या सर्वात पॉश समजल्या जाणाऱ्या परिसरात हिंदूजा बंधु यांचा महाल आहे.

आता तुम्ही म्हणालं महाल कसं काय, त्यांची देखील एक वेगळी गोष्ट आहे. ब्रिटनमधील संडे टाइम्सने एक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली, यामध्ये हिंदुजा यांच्याकडे 12 हजार 270 कोटी इतकी संपत्ती आहे असे जाहीर केले. हिंदुजा तेल, गॅस,बँकिंग, आयटी आणि रियल इस्टेट अशा क्षेत्रात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.2006 साली वेस्टमिन्सटर भागातील किंग जॉर्ज पंचमच्या आलीशान भागात एक सहा मजली इमारतीचा लिलाव करण्यात आला.

जगातील अनेक श्रीमंत लोकांनी यासाठी बोली लगावली. मात्र लंडनमधील हिंदुजा परिवाराने हा महाल विकत घेतला. संपूर्ण ब्रिटनला आश्चर्याचा धक्का बसला. एक भारतीय इतकी महागडी वास्तु विकत घेऊ शकतो. त्या नंतर ब्रिटनमध्ये फक्त हिंदुजा यांची चर्चा होती. हिंदुजा परिवाराने ही भव्य इमारत खरेदी केली त्या इमारीतच्या शेजारी बकिंगहम पॅलेस आहे. जिथे ब्रिटनचा राजपरिवार राहतो. म्हणून या परिसराला ब्रिटनमध्ये विशेष महत्व आहे.

भारतीय हिंदुजा थेट राजपरिवाराचे शेजारी झाले आहेत. हिंदुजा कुटुंबीयांनी विकत घेतलेल्या या घरात तब्बल 25 बेडरूम्स आहेत. या इमारतीची देखरेख करण्यासाठी अनेक नोकरचाकर आहेत. यातील अधिकांश नोकर हे इंग्रज आहेत. म्हणजेच काय ज्या इंग्रजांनी आपल्या भारतीयांवर राज्य केले ते त्या इंग्रजांना हिंदुजा यांनी त्यांच्या घरचं नोकर बनवलं आहे. विशेष म्हणजे हिंदुजा यांनी ही इमारत खरेदी केल्यानंतर तब्बल पाच वर्ष या इमारतीचे काम सुरू होते.

जुन्या सौंदर्यास धक्का न लावता हिंदूजा यांनी अतिशय सुंदर रितीने या इमारीतचे काम केले. पाच वर्ष काम केल्यानंतर त्यांनी भारतीय पद्धतीने पूजा करून मगच या घरात राहण्यास प्रवेश केला. हिंदूजा कुटुंबातील परमानंद हिंदुजा यांनी 1917 मध्ये तेव्हाच्या भारतातील कराची मध्ये व्यवसायाची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार मुंबईसह संपूर्ण देशांत केला. त्या नंतर त्यांनी इराणमध्ये आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. कित्येक वर्ष हिंदुजा ग्रुपचे इराणमध्ये होते, तेथील परिस्थिति बिघडत होती हे लक्षात घेऊन हिंदूजा बंधुनी त्यांचे मुख्यालय लंडनमध्ये हालविले. तेव्हा हिंदुजा एक छोटी कंपनी होती पण त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

आता हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीज म्हणून नावारूपास आली आहे. सध्या हिंदूजा कुटुंबात चार भाऊ आहेत.श्रीचंद हिंदुजा, गोपीचंद हिंदुजा, प्रकाश हिंदूजा, आणि अशोक हिंदुजा. जगातील अनेक मोठ्या देशात याची घरे आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबातील एकही व्यक्ति दारू पित नाही.किंवा इतर कोणतेही व्यसन नाही. संपूर्ण कुटुंब शुद्ध शाकाहारी आहे.भारतावर जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा तेव्हा हिंदुजा कुटुंबीय मदतीसाठी धावून येते.

अटल बिहारीजी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा देखील पोखरन येथे आपण अनू चाचणी घेतली होती तेव्हा संपूर्ण जगाने भारतावर निर्बंध लादले होते, तेव्हा ब्रिटिश सरकार समोर भारताची बाजू मांडत गोपीचंद हिंदूजा यांनी ब्रिटनला भारतावरील निर्बंध उठवायला लावले होते. विशेष बाब म्हणजे हिंदुजा कुटुंबीय इतके श्रीमंत असून देखील त्यांनी कधीच त्यांच्या संपत्तीचे प्रदर्शन केले नाही. उलट ते भारतीय संस्कृतीचे चांगले प्रदर्शन जगासमोर करतात.