Home » काश्मिरी पंडितांना मारणारा बिट्टा कराटे सध्या काय करतो ?
Articles Movies Uncategorized झाल कि व्हायरल!

काश्मिरी पंडितांना मारणारा बिट्टा कराटे सध्या काय करतो ?

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट 11 मार्चला रिलीज झाला. चित्रपटाला रिलीज करताना देखील अनेक अडचणी आल्या. चित्रपट रिलीज करू नये, त्यावर बंदी घालावी अशी मागणी देखील अनेकांनी केली. पण अखेर अडचणी फार करत चित्रपट मोठ्या पदड्यांवर रिलीज झाला. चित्रपट पाहून प्रत्येकजण विचारात पडला. 1990 म्हणजे किती अलीकडे घडलेली घडना आहे पण आपल्याला माहीत देखील नाही.

काश्मिरी हिंदू लोकांची अवस्था पाहून प्रत्येकांच्या मनात एकच चीड निर्माण झाली. चित्रपट प्रत्येकाने पहावा अशी विनंती अनेकजण करत आहेत.11 मार्चला हा चित्रपट रिलीज झाला होता. पल्लवी जोशी, अनुपम खेर या सारखी तगडी स्टार कास्ट या चित्रपटांमध्ये आहे, त्यांची कमाल अॅक्टिंग पाहण्यासाठी चित्रपट प्रत्येकाने पहावा . या चित्रपटांतील बिट्टा कराटे हे पात्र सध्या सोशल मिडियावर व्हायरलं होत आहे.

बिट्टाचे पात्र एक वेगळ्या प्रकारची चीड निर्माण करते. सध्या हा बिट्टा काय करतो हा प्रश्न अनेकांना पडला आहे? आजच्या लेखात आपण बिट्टा कराटे विषयी जाणून घेणार आहोत.बिट्टा कराटे सध्या जम्मू कश्मीर लिब्रेशनचा संचालक आहे. बिट्टाचा एक विडियो सोशल मिडियावर व्हायरलं होत आहे. या विडियोमध्ये त्याने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने हे कबूल केले आहे की त्याने 20 हून अधिक लोकांची हत्या केली आहे.

यातील अनेकजण हे काश्मिरी पंडित आहेत. बिट्टाला असा देखील प्रश्न विचारला गेला होता, तुम्ही इतक्या लोकांना मारले तेव्हा काय वाटले , त्यावर बिट्टा म्हणतो थोडावेळ विचित्र वाटले पण नंतर मात्र काहीच नाही. आमच्या संघटनेकडून आदेश मिळाले होते, जर यांनी सांगितलं असतं की तुमच्या आई किंवा भाऊ यांना देखील मारा, मी त्यांना देखील मारलं असतं.

बिट्टाला पुढे असे विचारले गेले की तू सर्वात आधी कोणाला मारले तेव्हा बिट्टा म्हणतो मी सतीश या काश्मिरी पंडिताला सर्वात आधी मारले. बिट्टा सांगतो 8 फेब्रुवारी 1990 रोजी मी सकाळी सतीशच्या घरी गेलो, त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या बहिणीने घराचा दरवाजा उघडला, तिला मी विचारलं सतीश कोठे आहे, तिने खोटं उत्तर दिलं. काही वेळाने सतीश त्यांच्या वडिलांचे औषध आणण्यासाठी बाहेर पडला त्यावेळेस बिट्टाने त्याला गोळी मारली.