औरंगाबादेतील कबीर सिंग, रस्त्यावर खुलेआम आपल्या प्रेयसी सोबत कीस करतांना बाईक चालवत असलेल्या कबीर सिंगचा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाला होता.
बीड बायपास परिसरातील अशोक नगर येथील रहिवासी २४ वर्षीय सुरज कांबळे हा रात्रीच्या वेळेस जालना रोड वर चालू बाईक वर कीस करत होता. आकाशवाणी चौकहून सेवन हिलकडे जातांना एका कार मधून हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. सुरज कांबळे च्या या व्हिडीओ ला अनेक नेटकऱ्यांनी औरंगाबादेतील कबीर सिंग म्हणून प्रतिक्रिया हि दिल्या तर अनेक मंडळींनी त्याच्यावर कारवाईची सुद्धा मागणी केली. या तरुणाला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे.
३१ डिसेंबर रोजी त्याला त्याच्या मित्रांनी चॅलेंज दिलं होतं, म्हणून त्याने हा स्टंट केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. शहरात वाहनांची मोठी गर्दी असल्यामुळे असे स्टंट अपघाती ठरू शकतात. अशी सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी टीका केल्यामुळे पोलिसांवर दबाव होता.