राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे नेहमी चर्चेत असतात. ते अनेक मुद्दे अगदी स्पष्टपणे मांडत असतात. कोल्हे हे एक अभ्यासू खासदार म्हणून ओळखले जातात. विधानभवनातील अनेक भाषणे देखील गाजतात. सोशल माध्यमांवर देखील कोल्हे अॅक्टीव्ह असतात. आता हेच पाहा अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर पुणे विमानतळांवरील एक सेल्फी शेअर केला. या फोटो द्वारे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
कोल्हे यांनी जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये पुणे विमानतळांवरील काही पेंटिंग दिसत आहेत. ही पेंटिंग पेशवेकालीन इतिहासाचे वर्णन करत आहेत, कोल्हे या पेंटिंगविषयी म्हणतात की पेशव्यांच्या इतिहासाचा आदर आहे पण पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर लाल महाल देखील आहे. जिथे शिवाजी महाराज यांनी पहिला सर्जिकल स्ट्राइक केला होता. सिंहगड देखील आहे. महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढु तुळापुर देखील आहे. पुणे एअर पोर्ट आॅथॅरिटीला महाराजांचा विसर पडला का? पुण्याला फार मोठा इतिहास लाभेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजामाता यांनी पुणे वसविले, हे इतिहासात ठळक आहे. पण काहीच्या मते पुण्यात मोठ्या प्रमाणात जातीय राजकरण केले जाते, त्यामुळे पुणे म्हटले की पेशवे हे समीकरण पुढे आणले जाते. पुण्याला शिवाजी महाराज यांचा फार मोठा इतिहास तर आहेच पण या बरोबरच पुण्यामध्ये जोतिबा फुले आणि त्यांच्या सामाजिक चळवळीचे देखील मोठे योगदान आहे. त्यामुळे पुण्याला फक्त पेशवेच्या इतिहासापुरते मर्यादित ठेवता येणार नाही.
पुण्याला शिवाजी महाराजचा वारसा लाभलेला आहे, त्या बरोबरच जोतिबा फुले यांचा लढा तसेच टिळकांचे चळवळीचे धोरण लाभले आहे. त्यामुळे पुणे हे पेशव्यापुरते मर्यादित नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि जोतिबा फुले, लोकमान्य टिळक यांचा देखील मोठा इतिहास लाभेला आहे. पुण्याचा इतिहास मर्यादित कधीच नव्हता.