Home » बाहेर कपडे वाळत घालू नका पंतप्रधान मोदी येतायेत!
झाल कि व्हायरल!

बाहेर कपडे वाळत घालू नका पंतप्रधान मोदी येतायेत!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक चर्चेत असणारे पंतप्रधान आहेत. भारतासारख्या विशाल देशांचे पंतप्रधान पद भूषविणे तेवढे सोप्पे नाही. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देखील चोख असावी लागते. मोदीच्या सुरक्षितेची खूप काळजी घेतले जाते. आता हेच पहा उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मोदी एका कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी एक आठवडा पूर्वीच तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी या संदर्भात एक पत्र स्थानिक नागरिकांना जारी केले आहे. हे पत्र सध्या सोशल मिडियावर सध्या प्रचंड व्हायरलं होत आहे. मोदींच्या सुरक्षितेचा भाग म्हणून पोलिसांनी तेथील स्थानिक नागरिकांना 19 नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या दरम्यान बाल्कनीत किंवा खिडकीमध्ये कपडे वाळत घालू नका असा फतवा काढला आहे. लखनऊ येथील सरस्वती अपार्टमेंटमधील  नागरिकांना पोलिस निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी पत्र पाठवलं आहे.यामध्ये मोदींचा दौरा होईपर्यत कपडे बाहेर वाळत घालू नका. अशा सूचना केल्या आहेत.

या भागातील सर्व उंच इमारती आणि टॉवर्स यांना या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन कोणी व्यक्ती स्थानिकांनाकडे राहत असेल तर त्यांची देखील माहिती पोलिसांना देण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या हे सुचनेचे पत्र सोशल मिडियावर  प्रचंड व्हायरलं होत आहे. आता पर्यत 700 हून अधिक नागरिकांनी हे शेअर केले आहे.