शेख मोहम्मद बिन रशीद अल मखदूम (Shaikh Mohammad). हे नाव जितकं मोठ आहे तितकाच मोठा ह्या माणसाचा पसारा मोठां आहे. हा दुबईच्या शासक असलेल्या मानसाच नाव आहे. इतकाच नाही तर UAE चे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती आहेत. आता त्यांच्या श्रीमंतीचा पसारा सांगण्याची गरज नाहीये. पैसा अफाट असेल हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल.

शेख मोहम्मद आलिशान आयुष्य जगतात. त्यांना एकूण सहा बायका आहेत. सहा बायकांपासून त्यांना अनेक मुलं झाली असतील हे हि वेगळ सांगायची गरज नाही. पैसा खूप असला तरी त्यांच्या आयुष्यात स्त्रियांना मात्र स्वातंत्र्य नाहीये. २००४ साली शेखचं सहावं लग्न झालं. जॉर्डनचे राजे अब्दुल्लाची सावत्र बहीन हया (Haya Bint Hussein) हिच्यासोबत त्यांचं लग्न झालं. या दोघांमध्ये तब्बल २५ वर्षांचा अंतर असूनही दोघांच ट्युनिंग चांगलच जुळल होतं.

जिथं-जिथं हे जोडप सोबत दिसत होतं, एकमेकांची स्थुती करतांना ते थकत नव्हते. सर्व काही सुरळीत सुरु असतांना २०१९ साल उजाडलं. तुम्हाला आठवत असेल तर दुबईच्या राणीचं बॉडीगार्ड सोबत अफेयर आहे अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. तर ती राणी हयाच होती. हया आणि बॉडीगार्डचं अफेयर आहे अशी शंका शेखला येऊ लागली, शेख हा इतका पोहोचलेला निघाला कि त्याने आपल्या बायकोमागे थेट टेगासास लावून हेरगिरी करत असे.

आता हळू-हळू हे हया च्या अफेयर्स च्या अधिक विस्तृत बातम्या समोर येतात. ह्या चं एका बॉडीगार्ड सोबत अफेयर होतं, तर या गोष्टीची मोठी माहिती असलेल्या इतर बॉडीगार्ड ला आपलं तोंड बंद ठेवण्यासाठी तुफान पैसा ती खर्च करत होती. आपल्या १० वर्षीय मुलीच्या खात्यातून तीने तब्बल ७.५ मिल्लीयान डॉलर काढून ते बॉडीगार्ड ला दिले होते. हया चं वय ४७ वर्ष होतं तरी तिचं तिच्या बॉडीगार्ड (Russell Flowers Haya Bodyguard) सोबतचे अफेयर होत. त्या ब्रिटीश नागरिक असलेल्या रसेल फ्लॉवरचं वय होत ३७ वर्ष.

प्रेमात वय आणि परिस्थिती बघितली जात नाही. याच कदाचित उदाहरण म्हणून हि लवस्टोरी सांगितली जाईल कि काय काही सांगितलं जात नाही. २०१६ साली त्यांच प्रेम प्रकरण सुरु झालं. शेवटी ७२ वर्षीय शेख हि काही कमी नाही हयानं लाख प्रयत्न करूनही शेख ला या गोष्ठी ची माहिती लागली. हया गुपचूप आपली दोन्ही मुलं घेऊन ब्रिटन (Britain) ला निघून गेली. तिथे मग घटस्पोटासाठी खटला उभा राहिला.
२ वर्षे चाललेला हा खटला आता अंतिम टप्प्यात आला. दोन्ही मुलांची जबाबदारी हयालाच देण्यात यावी असं न्यायालयान म्हटलं. आणि त्यानुसार जी तडजोड झालीये त्यात शेख मोहम्मद हया ला तब्बल पाच हजार कोटी रुपये देणार आहे. ब्रिटन च्या इतिहासातील सर्वात महाग घटस्पोट म्हणून या विषयाची चर्चा होतेय आणि विशेष म्हणजे या दोघांपैकी कुणीच मुळ ब्रीटीश नाही. शेख मोहम्मद कडून नेणार असनारा पैसा हया आणि तिच्या मुलांच्या सुरक्षा आणि शिक्षणाच्या खर्चासाठी. तशाच इतर गोष्टींसाठी खर्च करणार आहे.