दिपिका आणि प्रियांका म्हणजेच पिसीचे चाहते जगभर असून ते सोशल मीडियावर आपल्या सेलेब्सना फॉलो करत असतात. आपल्या हॉट आणि देखण्या प्रेझेन्समुळ या दोघी लाखो दिलोंकी धडकन आहेत. या दोघींचेही चित्रपट तिकीटबारीवर सुपरहिट ठरतात. प्रियांका चोप्रा तर विश्वसुंदरी राहिली आहे. या दोघींचा इनफ्लूएन्स तरुणाईवर जबरदस्त दिसून येतो. दोघींचीही पोस्ट पाहण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. दोघींनीही फिल्म इंडस्ट्रीत स्वताच स्थान निर्माण करून अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

नुकताच दीपिकाने दाक्षिणात्य स्टार प्रभासबरोबर एक चित्रपट साईन केला ज्यासाठी तिने तब्बल वीस कोटी मानधन घेतल आहे. प्रियांकाही जवळपास तेवढच मानधन घेते. दोघींचीही फॉलोअर्स संख्या थक्क करणारी आहे.दिपिकाचे ५०.२ मिलियन फॉलोअर्स तर पिसीचे ५५.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. दिपिका आपल्या एका सोशल मीडिया पोस्टसाठी १.४२ करोड ₹ घेते तर प्रियांका २ करोड ₹ घेते. फॅन फॉलोअर्सच्या बेसवर वेगवेगळ्या प्रोडक्टसच्या अॅड या स्टारला आॅफर केल्या जातात.
मुंबई क्राईम ब्रँच करणार चौकशी

मुंबई क्राईम ब्रँचकडे याविषयी तक्रार येताच त्यांनी याची चौकशी सुरू केली, तपास पुढच्या टप्प्यात येईल तसे बुचकळ्यात टाकणारे खुलासे समोर येत आहेत. या तपासात प्रियांका आणि दिपिकासह इतर दहा बॉलिवूड स्टारचे फेक फॉलोअर्स आढळून आले आहेत. या फेक फॉलोअर्सना इन्सटाग्रामच्या भाषेत बोट्स संबोधले जाते.मुंबई पोलीस या सेलेब्सची चौकशी करणार असून त्यासाठी १०० ते१२५ लोकांचे स्टेटमेंट घेतले जातील. तसेच या पोलीस चौकशीदरम्यान या स्टारना त्यांच्या फॉलोअर्सचे नंबर प्रुव करावे लागतील, याचाच अर्थ या स्टारना त्यांचे फॉलोअर्स खरे असून कोणत्याही कंपनीकडून खरेदी केले नसल्याचे सिध्द कराव लागेल. या प्रकरणात यापूर्वीच १८ जणांची चौकशी झाली असून त्यात डेलीसोप स्टार, कोरिओग्राफर, मेकअप आर्टिस्ट इ समावेश आहे.
कसा चालतो हा ठगी स्कॅम?

मुंबई पोलिसांना केलेल्या तपासात ६८ सोशल मिडिया रिलेटेड कंपन्या अशाप्रकारे फेक फॉलोअर्स पुरवण्याच रॅकेट चालवत असल्याच निष्पन्न झाल आहे. क्राईम ब्रांचनुसार ही पूर्ण सिस्टिम कॉस्ट पर पोस्टनुसार चालते. यात ह्यूज फॅन बेस असलेल्या स्टारचे पर पोस्ट रेट ठरलेले असतात. या पोस्टला मिळणारे लाईक आणि व्यू या स्टारचे स्टारडम वाढवण्याबरोबरच विविध प्रॉडक्टच्या जाहिराती मिळवून देण्यास फायदेशीर ठरतात. या सिस्टीमचा मुख्य बेस डिजीटल फुटप्रिंट असून यावरून अनेक नॅशनल तसेच इंटरनॅशनल अॅडव्हरटायजर कंपन्यांना संबधित स्टारच्या फॉलोअर्सची संख्या, त्याच्या कोणत्या पोस्टला किती लाईक मिळाले, कमेंट, व्यू तसेच लाईक करणारा वयोगट, त्यांची आवड, आर्थीकता या आणि इतर बाबींची माहिती मिळते ज्याचा वापर करून या अॅड कंपन्या संबधित स्टारला प्रोडक्टची अॅड आॅफर करतात. फॅन फॉलोअर्स जितके जास्त तितका या स्टारचा रेट जास्त ठरतो. या सगळयातूनच असे फेक फॉलोअर्स थोक भावात विविध सोशल मीडिया मार्केटिंग कंपन्यांकडून खरेदी केले जातात. प्रियांका आणि दिपिकाच्या चौकशीतून आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Add Comment