Home » हळदीत नाचतांना पडला तिच्या प्रेमात, असा दिला मोबाईल नंबर..बघा Video
झाल कि व्हायरल!

हळदीत नाचतांना पडला तिच्या प्रेमात, असा दिला मोबाईल नंबर..बघा Video

सगळीकडे सध्या लग्नसराईची धूम सुरु आहेत आणि त्यामुळे लग्नात होणार्या हळदी समारंभातील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. लग्नाच्या हळदीमध्ये नाचगाणे, धम्माल मस्ती असच काहीस चित्र मंडपात दिसू लागत. असे असंख्य लग्नातील फोटो आणि व्हिडिओ यांचा सध्या सोशल मिडीयावर ढीगभर साठा पाहायला मिळतो. अनेकांचे तर याच कार्यक्रमात किस्से तयार होतात आणि वेळप्रसंगी जोडीदार देखील मिळतो.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओतील तरुण हळदीच्या कार्यक्रमात नाचता नाचता एका तरुणीच्या प्रेमात पडतो. आणि आता पुढे ओळख वाढावी म्हणून त्याची तिला नंबर देण्याची अनोखी धडपड सुरु असते.

इतक्या गर्दीत तिला सगळ्यांसमोर मोबाईल नंबर देणार कसा यासाठी त्याला एक युक्ती सुचते जी पाहून तुम्हाला हसू देखील आवरणार नाही.

त्या व्हायरल व्हिडिओत मुलगा बँडच्या तालावर नाचत असतो. तितक्यात एका मुलीच्या नजरेस नजर भिडते आणि तिच्या प्रेमात तो पडतो. पुढे तिला त्याचा मोबाईल नंबर देण्यासाठी विशेष युक्ती लढवतो. नाचता नाचता आकडेमोड करत तो तरुण त्या मुलीपर्यंत त्याचा मोबाईल नंबर पोहचवतो.

ती तरुणीसुद्धा एक एक करून सगळे आकडे जशाच तसे मोबाईल मध्ये टाईप करून लगेच त्याला त्याच नंबरवर कॉल करते. ते बघून मुलाची मोहीम फत्ते झाल्याने तो अजूनच बेभान होत नाचू लागतो. हाच व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर ट्रेंड होताना दिसतोय.